

पुढारी ऑनलाईन डेस्क : द डायरी ऑफ वेस्ट बंगालचा ट्रेलर रिलीज होताच वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना कायदेशीर नोटीस पाठवलीय. ३० मे रोजी चौकशीसाठी पश्चिम बंगालमधील एमहर्स्ट स्ट्रीट पीएस येथे बोलावलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ते बंगाल सरकारची बदनामी करण्याच प्रयत्न करत आहेत, असा आरोप दिग्दर्शकावर करण्यात आला आहे.
वसीम रिजवी चित्रपट द्वारा प्रस्तुत 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' जितेंद्र नारायण सिंह निर्मित आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा द्वारा लिखित आणि दिग्दर्शित करण्यात आलाय. निर्माते तापस मुखर्जी आणि अचिन्तया बोस आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच वाद निर्माण झालाय. असे म्हटले जात आहे की, हा चित्रपट ममता सरकारच्या सत्य घटनेवर आधारित आहे.
दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना ३० मे रोजी पश्चिम बंगालमधील एमहर्स्ट स्ट्रीट पीएसमध्ये चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आलीय.
नोटीसवर सनोज मिश्रा म्हणाले, "राज्याची प्रतिमा मलिन करणे वा बदनाम करण्याचा माझा हेतू नाही. आम्ही चित्रपटात फक्त तथ्ये दाखवली आहेत ज्यात चांगले संशोधन केले आहे."