

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील पंचायत निवडणुकी दरम्यान केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात करण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात पश्चिम बंगाल सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने आज (दि.१७) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आयोगाने वरिष्ठ अधिकारी तसेच सरकारच्या कायदे तज्ञांसोबतच्या बैठकीनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (West Bengal Panchayat polls)
कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ४८ तासांच्या आता राज्यात पंचायत निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय दलाची नियुक्ती करण्याची मागणी करावी तसेच सुरक्षा दलाची तैनात करण्याचे आदेश गुरूवारी दिले होते. भाजप नेते शुभेंदु अधिकारी तसेच कॉंग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रीय दलांची तैनाती करण्याची मागणी करीत न्यायालयात धाव घेतली होती. (West Bengal Panchayat polls)
२०२२ मधील महानगर पालिका तसेच २०२१ मध्ये कोलकाता महानगर पालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या व्यापक हिंसाचाराचे दाखला देत याचिका दाखल केली होती. दरम्यान,आता उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :