

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात सोमवारी दिवसभर गार वारे अन् दाट धुक्याची चादरच पसरली होती. किमान तापमानात घट होऊनही
दक्षिण भारतातून आलेल्या गार वार्यांनी शहरात बोचरे वारे सुटल्याने पहाटे थंडीचा जबरदस्त तडाखा जाणवत आहे. शहराच्या किमान तापमानात सोमवारी 2 अंशांनी वाढ झाल्याने ते 12 वरून 14 अंशावर गेले. मात्र, तरीही शहरात थंडीचा कडाका कायम आहे.
कारण दक्षिण भारतात तुफान पाऊस सुरू आहे. किमान तापमान वाढले तरीही बोचर्या वार्यांनी नागरिक थंडीचा अनुभव घेत आहेत. पहाटे विविध भागांतील टेकड्यांवर फिरायला येणारे नागरिक हा अनुभव घेत आहेत.
पाषाण 13.1, शिवाजीनगर 14.5, एनडीए 16.1, लवळे 18, चिंचवड 19.4, वडगावशेरी 20.2, कोरेगावपार्क 18.7.
हेही वाचा