Weather News : राज्यात शीतलहरी सौम्य; नगर 11.7 तर पुणे 12.1 अंशांवर

Weather News : राज्यात शीतलहरी सौम्य; नगर 11.7 तर पुणे 12.1 अंशांवर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढगाळ वातावरणामुळे उत्तर भारतातून येणार्‍या शीतलहरींना काही प्रमाणात अडथळा आल्याने थंडीची लाट किंचित कमी झाली आहे. गुरुवारी नगरचे तापमान सर्वांत कमी 11.7 अंशांवर होते. दरम्यान, राज्यात 2 जानेवारीपर्यंत थंडी राहील. त्यानंतर ती कमी होत जाईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उत्तर भारतात पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांत अजूनही तापमान 4 ते 8 अंशांवर आहे. त्या भागात दाट धुके असल्याने द़ृष्यमानता 50 मीटरपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे हवामानाचा रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्रात मात्र अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त ढग आल्याने 30 डिसेंबर ते 2 जानेवरी या काळात ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्याचा परिणाम बुधवारपासून दिसून आला.

गुरुवारचे राज्याचे किमान तापमान

नगर 11.7, पुणे 12.1, जळगाव 13.9, कोल्हापूर 17.2, महाबळेश्वर 14.6, नाशिक 14.1, सांगली 16.8,सातारा 13.8, सोलापूर 16.4, धाराशिव 16.1, छत्रपती संभाजीनगर 13, परभणी 13.4, नांदेड 16,बीड 15, अमरावती 14.9, बुलडाणा 15.4, चंद्रपूर 13, गोंदिया 12.4.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news