

पुणे : पुढारी वृत्तसेवा
पुण्याजवळील सासवडमध्ये दोन कचरा वेचक भुर्जीपावच्या दुकानाजवळ बसल्यानंतर उठत नाहीत म्हणून मालकाने काठीने त्यांना मारहाण केली तसेच अंगावर गरम पाणी ओतले. या अमानुष हत्येचा निषेध करण्यासाठी कागद, काच, पत्रा, कष्टकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत. आंदोलनात जेष्ठ समाजसेवक डॉ बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.
अमानुषपणे केलेल्या या मारहाणीमुळे दोन बेवारस गरीब कचरावेचकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. ही मारहाण होत असताना अनेक नागरिक बघत होते, पण कोणीही हस्तक्षेप केला नाही. तसेच पोलीस स्टेशनपासून जवळच ही घटना घडली असताना पोलिसांनी देखील दखल घेतली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला आहे.
मारहाण झालेले दोन्ही कचरावेचक रात्रभर मदतीसाठी वाट बघत तडफडत होते. परंतु कोणीही मदतीला धावून आले नाही. या घटनेमुळे समाजातील गरीब-वंचित- शोषित घटकाबद्दल समाजाची आणि व्यवस्थेची असंवेदनशीलता समोर आली आहे.