मिळालेल्या माहितीनुसार, मत्स्योद्योग विभागातील अधिकारी नावेने बोर धरणात असलेल्या मत्स्य पालन केंद्रावर तपासणीसाठी गेले होते. तिथे पाहणी केल्यानंतर परत येत असताना काठावरील प्लँटफार्मवर उभे होते. दरम्यान प्लँटफार्म पलटी झाल्याने ते पाण्यात पडले. यात युवराज फिरके पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात येते. इतर चार जण दोरीला पकडून असल्याने ते बचावले. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेनंतर येथे एकच खळबळ निर्माण झाली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. (दि.१८) पोलिस व एनडीआरएफच्या टिमचे साहाय्याने शोधमोहीम सुरू केली. शोध कार्य सुरू असून अधिक तपास सेलू पोलिस करीत आहे.