अमेरिकेत सोडणार
240 कोटी डास
विश्वसंचार
अमेरिकेत सोडणार 240 कोटी डास
न्यूयॉर्क : भविष्यात डासच डासांचा प्रकोप कमी करण्यास मदत करणार आहेत. खरे तर डेंग्यू, यलो फिवर आणि जिका यांसारखे अनेक आजार होण्यास डास जबाबदार असतात. अमेरिकेत अशा डासांना नष्ट करण्याची जबाबदारी सुमारे 240 कोटी डास पार पाडणार आहेत.
- नाशिक : इगतपुरीत हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा; 20 तरुणींसह 75 जणांना अटक
येत्या दोन वर्षांत अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडामध्ये खास प्रकारचे लाखो डास सोडले जाणार आहेत. जे आजार पसरविणार्या डासांना नष्ट करणार आहेत. हे पाऊल ऑक्सफर्ड यूकेच्या पेस्ट कंट्रोल डेव्हलपमेंटर फर्म ऑक्सिटेकने उचलले आहेे.
ऑक्सिटेक फर्मच्या मते, आजार पसरविण्याचे काम मादी डास करत असतात. यामुळे प्रयोगशाळेत तयार झालेले जेनेटिकली मोडिफाईड नर डासांना शहरांमध्ये सोडण्यात येणार आहे. हे नर डास मादी डासांना नष्ट करतील. जेनेटिकली मोडिफाईड डासांना 'ऑक्सिटेक डास' असे नाव देण्यात आले आहे.

