

अमेरिकेतील ओहायो येथील झिऑन क्लार्कचा जन्म ‘कॉडल रिग्रेशन सिंड्रोम’ नावाच्या जन्मजात स्थितीसह झाला होता. त्याच्या स्थितीमुळे आलेल्या अडचणी आणि बालपणात सोसावा लागलेला त्याग असूनही, क्लार्कच्या सकारात्मक मानसिकतेने त्याला आयुष्यात टिकून राहण्यास मदत केली.
प्राथमिक शाळेत त्याची ओळख कुस्तीशी झाली आणि हायस्कूलमध्ये तो व्यावसायिक कुस्तीपटू बनला. ‘हातांवर चालत 20 मीटर अंतर सर्वात वेगाने पार करण्याचा’ विक्रम केल्याबद्दल तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् 2022 मध्ये समाविष्ट आहे. त्याने हा टप्पा केवळ 4.78 सेकंदांच्या आश्चर्यकारक वेळेत पूर्ण केला.