Viral Video: मिलन सुरू असतानाच मादी आपल्या नर जोडीदाराला जिवंत खाते; पाहा निसर्गातील अजब व्हिडिओ

मादी 'प्रेईंग मॅंटिस' (नाकतोडा) प्रजननादरम्यान आपल्या नर जोडीदाराला जिवंत खाते. निसर्गातील या अजब आणि क्रूर वाटणाऱ्या प्रक्रियेला विज्ञानाच्या भाषेत लैंगिक नरभक्षण असे म्हटले जाते.
Viral Video
Viral Videofile photo
Published on
Updated on

Viral Video

निसर्गाचे नियम मानवी जगापेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका निसर्गचक्राचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मादी 'प्रेईंग मॅंटिस' (नाकतोडा) मिलन सुरू असतानाच आपल्या नर जोडीदाराला जिवंत खाताना दिसत आहे. निसर्गातील या अजब आणि क्रूर वाटणाऱ्या प्रक्रियेला विज्ञानाच्या भाषेत 'लैंगिक नरभक्षण' (सेक्सुअल कॅनिबालिझम) असे म्हटले जाते.

व्हायरल व्हिडिओमध्ये मादी मॅंटिस प्रजननाच्या प्रक्रियेत असतानाच अचानक नराचा शिरच्छेद करते आणि त्याला खाण्यास सुरुवात करते. विशेष म्हणजे, नराचे डोके धडावेगळे झाल्यानंतरही उर्वरित शरीर प्रजननाची प्रक्रिया पूर्ण करत राहते. हे विदारक दृश्य पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Viral Video
Valentine's Day Special | प्राणीही करतात ‘प्रपोज’! कुणी डोकं टेकवतं, कुणी काढतं हवेत बुडबुडे

लैंगिक नरभक्षण म्हणजे काय?

कीटकांमध्ये लैंगिक नरभक्षण ही प्रक्रिया नवीन नाही. प्रेईंग मॅंटिसच्या बाबतीत १३ ते ३१ टक्के प्रकरणांमध्ये मादी नराला खाऊन टाकते. संशोधकांच्या मते, ही क्रूरता नसून उत्क्रांतीचा एक भाग आहे. नराला खाल्यामुळे मादीला मोठ्या प्रमाणावर प्रथिने आणि पोषक तत्वे मिळतात. या अतिरिक्त पोषणामुळे मादी जास्त प्रमाणात आणि सुदृढ अंडी घालू शकते. नर आपला जीव गमावून पुढील पिढीला जगण्यासाठी आवश्यक ऊर्जा पुरवतो.

नर मँटिस वाचू शकतो का?

नर मॅंटिसला या धोक्याची पूर्ण कल्पना असते. त्यामुळे तो मादीजवळ जाताना सावधगिरी बाळगतो. मादी भुकेलेली आहे की नाही, हे तो तिच्या गंधावरून ओळखण्याचा प्रयत्न करतो. प्रजनन पूर्ण होताच अनेक नर तातडीने पळ काढतात, मात्र जे अयशस्वी ठरतात, त्यांचा बळी जातो.

मधमाशांच्या जगातही 'बलिदान'; मीलनानंतर नराचा होतो जागीच मृत्यू

केवळ मॅंटिसच नाही, तर मधमाश्यांच्या जगातही नर 'ड्रोन'ची अवस्था अशीच असते. राणी माशीसोबत मीलनानंतर नराचा जागीच मृत्यू होतो. निसर्गात केवळ आपली प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी नर स्वतःच्या प्राणांची आहुती देत असल्याचे हे उदाहरण आहे.

सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी याची तुलना आधुनिक काळातील 'डेटिंग' आणि 'रिलेशनशिप'शी करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी याला 'सिच्युएशनशिप'मधील धोक्याचे प्रतीक म्हटले आहे, तर काहींनी "पुरुषांना नात्यात सर्वस्व पणाला लावावे लागते" अशा आशयाचे मिम्स शेअर केले आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ आपल्याला कीटकसृष्टीची एक झलक दाखवतो, जिथे प्रेम आणि धोका हे दोन्ही सोबतच नांदतात. 'प्रेइंग मँटिस'चे हे वर्तन वरकरणी क्रूर वाटू शकते; तरीही, ते संपूर्ण प्रजातीची ताकद आणि सातत्य टिकवून ठेवण्याचे काम करते.

Viral Video
आगोदर पळत होता मोर, मागे शिकारासाठी होता वाघ... मग हरणाच्या पिल्लासोबत जे झालं.. व्हिडिओ व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news