

लास वेगास : 'जुनं ते सोनं' असे म्हटले जाते ते काही उगाचच नाही. विशेषतः 'व्हिंटेज' वाहनांना तर मोठीच किंमत मिळत असते. एके काळी सायकलीसारख्या दिसणार्या मोटारसायकली बनल्या आहेत. आता अशाच हार्ले डेव्हिडसनच्या एका व्हिंटेज बाईकचा लिलाव झाला आहे. ही बाईक 1908 मध्ये हार्ले डेव्हिडसन (Old motorcycle) कंपनीने बनवली होती. ही 115 वर्ष जुनी बाईक होती आता लिलावात विकली गेलेली जगभरातील सर्वात महागडी बाईक ठरली आहे. 1908 च्या हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलचा 935,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 7.73 कोटी रुपयांमध्ये लिलाव झाला.
लास वेगासमधील मॅकम ऑक्शन्सने (Old motorcycle) हा लिलाव आयोजित केला होता. मॅकमच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की हा हार्ले डेव्हिडसन स्ट्रॅप टँक अत्यंत दुर्मीळ प्रकारच्या सर्वात जुन्या मॉडेलपैकी एक आहे. हे 1908 मध्ये बनवलेल्या 450 मॉडेलपैकी एक आहे.
मॅकम ऑक्शन्सच्या मोटारसायकल विभागाचे व्यवस्थापक ग्रेग अरनॉल्ड यांनी सांगितले की, ही बाईक 1941 मध्ये डेव्हिड उहलिन यांना विस्कॉन्सिनच्या कोठारात सापडली होती, (Old motorcycle) त्यांनी ती 66 वर्षे त्यांच्याकडे ठेवली. ते नंतर पुनर्संचयित केले गेले, ज्यात त्याची टाकी, चाके, सीट कव्हर आणि इंजिन बेल्ट पुली यांचा समावेश होता. त्याच वेळी, मॉडेलला स्ट्रॅप टाकी असे नाव देण्यात आले कारण त्याचे तेल आणि इंधन टाक्या फ—ेमला निकेल-प्लेटेड स्टीलच्या पट्ट्यांसह जोडलेले होते. 1908 मध्ये कंपनीने फक्त 450 युनिटस्चे उत्पादन केले होते आणि आता जगात मोटारसायकलचे फक्त 12 मॉडेल्स उपलब्ध मानले जातात.
हेही वाचा :