![कबाब खरेदी करण्यासाठी गेला आणि कोट्यधीश झाला!](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F05%2FReal-estate-listing-presentation-19.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
लंडन ः कुणाचे नशीब कधी पालटेल हे काही सांगता येत नाही. एक बस ड्रायव्हर चिकन कबाब खरेदी करायला गेला आणि चक्क दहा कोटींचा मालक बनला. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? पण हे खरेय. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ही घटना बि—टनच्या लिसेस्टर शहरातील आहे.
एक 51 वर्षीय बस ड्रायव्हर प्रवासादरम्यान एका कबाब शॉपवर थांबला आणि त्याने चिकन कबाबची ऑर्डर दिला. चिकन कबाब यायला वेळ होता म्हणून टाईमपाससाठी त्याने जवळच्या लॉटरी शॉपमधून एक तिकीट खरेदी केले आणि त्याला चक्क दहा कोटी 25 लाख रुपयांची लॉटरी लागली. या नशीबवान व्यक्तीचे नाव स्टीव्ह गुडविन आहे. स्टीव्ह सांगतो की त्याच्या लॉटरीचा नंबर 73 होता. त्याला कधीही वाटले नव्हते की तो इतकी मोठी रक्कम जिंकू शकेल; पण जेव्हा लॉटरी ऑफिसच्या कर्मचार्यांनी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याला सुखद धक्काच बसला.
स्टीव्ह पुढे सांगतो, "जेव्हा मी लॉटरीचे तिकीट जिंकून घरी गेलो तेव्हा मी कबाब खाण्यासाठी काढले; पण मी एवढा आनंदी होतो की मी कबाब खाऊ शकलो नाही. याच कबाबने मला करोडपती बनवले, हा विचारच माझ्या मनातून जात नव्हता. रात्रभर मी लॉटरीचे तिकीट उशीखाली घेऊन झोपलो." स्टीव्हने सुरुवातीला आपल्या आईला ही आनंदाची बातमी दिली. सुरुवातीला कुणालाच त्याच्यावर विश्वास बसला नाही. नंतर सर्वांना कळले की तो खरे बोलतोय. विशेष म्हणजे लॉटरी विजेता झाल्यानंतरही स्टीव्ह आताही ड्रायव्हरची नोकरी करतोय.
-हेही वाचा