उंच ठिकाणांवरून पडूनही मांजर कसे राहते सुरक्षित?

उंच ठिकाणांवरून पडूनही मांजर कसे राहते सुरक्षित?
Published on
Updated on

नवी दिल्ली ः आपल्या अवतीभोवती असलेल्या काही प्राण्यांविषयी आपल्याला कुतुहल असते.(cat) पाल भिंतीवर कशी चालते, सरडा रंग कसा बदलतो किंवा मुंग्या एका रांगेनेच कशा जातात याबाबतही आपल्याला कुतुहल वाटू शकते. (cat) त्याचप्रमाणे घरातील मनीमाऊ उंच ठिकाणांवरून खाली उडी मारूनही कशी सुरक्षित राहते याचेही कुतुहल वाटू शकते.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, उंच ठिकाणांवरून पडल्यानंतरही मांजरांना (cat) काही होत नाही, यामागे त्याच्या शारीरिक स्वरूपाची मोठी भूमिका आहे. मांजर हे खाली पडत असताना ते हटकून पायांवरच पडते. मांजर हे मुळात जमिनीवर आणि झाडांवर राहणारे वन्यजीव आहेत. झाडावर राहिल्यामुळे मांजरांना नेहमी खाली पडण्याची भीती असते. या कारणामुळे कालांतराने, त्याने आपले शरीर अशाप्रकारे लवचिक बनवले आहे की, ते पडताच त्वरित प्रतिक्रिया देतात.

शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा एखादी वस्तू खाली पडते, तेव्हा जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी तिच्या शेवटच्या गतीला टर्मिनल वेग म्हणतात. एकप्रकारे, हा गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीचा आणि हवेच्या वरच्या जोराचा परिणाम आहे.1987 मध्ये केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले की, मांजरींच्या खाली पडण्याचा टर्मिनल वेग इतर प्राणी आणि मानवांपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे मांजराला फारसे काही होत नाही. अभ्यासात असे आढळून आले की, खाली पडताना मांजर आपले चार पाय पसरते आणि पोट वर उचलते. त्यामुळे तिचे पोट पॅराशूटप्रमाणे काम करू लागते आणि खाली पडण्याचा वेग कमी होतो.

खाली जमिनीला स्पर्श करण्यापूर्वी, मांजर शेपूट वर उचलते, जेणेकरून तिचे पाय आधी जमिनीला स्पर्श करतात आणि पोट, तोंड यासह आवश्यक अवयवांना इजा होण्यापासून वाचवले जाते. या युक्तीमुळे, मांजर सहसा कोणत्याही उंचीवरून पडूनही सुरक्षितपणे जगते. मांजरींवरील अभ्यास अहवालानुसार, न्यूयॉर्कच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाने उंच इमारतींवरून खाली पडलेल्या 132 मांजरींचा शोध घेतला. यापैकी 90 टक्के मांजरांना मृत्यूपासून वाचवण्यात यश आले हे आश्चर्यकारक आहे. पण या मांजरांना त्या घटनेच्या वेळी किरकोळ उपचारांची गरज असल्याचे देखील समोर आले आहे. एक मांजर 32 व्या मजल्यावरून पडले होते, तेव्हा त्याचा एक दात तुटला होता आणि फुफ्फुसाला थोडा त्रास झाला होता; पण दोनच दिवसांत त्याच्यावर उपचार करून त्याला सोडण्यात आले.

-हेही वाचलं का

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news