शरीर निरोगी ठेवण्यासाठी डाळिंबाचे सेवन गुणकारी

डाळिंब हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर
Health benefits of pomegranates
शरीर निरोगी ठेवण्यासाठी डाळिंबाचे सेवन गुणकारी.Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : डाळिंब हे एक असे फळ आहे, जे दिसायला सुंदरच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. रक्त वाढवण्यासाठी डाळिंब उपयुक्त ठरते, हे बहुतेकांना माहीत आहे; पण या फळामुळे आपल्या शरीराला अन्यही अनेक प्रकारे फायदा होतो. चला जाणून घेऊ या.

Health benefits of pomegranates
आजारांना दूर ठेवण्यासाठी भेंडीचे सेवन ठरते उपयुक्त

डाळिंबात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. डाळिंबात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. ते शरीराला संसर्गाशी लढण्यास आणि रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. डाळिंब हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. डाळिंबातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि पचनसंस्था निरोगी राहते. डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. डाळिंबात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात. हे सुरकुत्या आणि डाग कमी करण्यास मदत करतात. डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. डाळिंबाचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो, असे अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. डाळिंब रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त आहे. तुम्ही डाळिंब ताजे खाऊ शकता, त्याचा रस पिऊ शकता किंवा सॅलडमध्येदेखील समाविष्ट करू शकता.

Health benefits of pomegranates
शरीर निरोगी राहण्यासाठी या आहेत ‘खास’ टिप्स…

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news