Barley Health Benefits | बार्लीमधील बीटा-ग्लुकन फायबर कोलेस्ट्रॉल करते कमी

Barley Health Benefits | आजची तरुण पिढी आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाली आहे.
Barley Health Benefits
Barley Health Benefits Pudhari File photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली (पुढारी वृत्तसेवा): आजची तरुण पिढी आपल्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाली आहे. वाढत्या वजनाच्या आणि रक्तातील साखरेच्या (ब्लड शुगर) समस्यांच्या काळात, खाण्यापिण्यात हेल्दी पर्याय शोधण्याचे प्रमाणही वाढले आहे. याच कारणामुळे भरड धान्यांसोबतच (मिलेट्स) बार्ली म्हणजेच जवच्या पिठाची बरीच चर्चा होत आहे.

Barley Health Benefits
Nashik To New Delhi Flight | नाशिककरांसाठी खूशखबर! ओझर ते नवी दिल्ली थेट विमानसेवा 1 ऑक्टोबरपासून पूर्ववत सुरू

वास्तविक, जवमध्ये 'बीटा-ग्लुकन' नावाचा विरघळणारा फायबर (घुलनशील फाइबर) आढळतो, जो कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि जेवल्यानंतर ब्लड शुगरमध्ये होणारी वाढ नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतो. तसेच, यामध्ये असलेले फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. यामुळे वजन व्यवस्थापनात मदत होते.

जव हे एक संपूर्ण धान्य (Whole Grain) आहे. याच्या पिठाचे सेवन केल्याने फायबर, प्रथिने (प्रोटिन), व्हिटॅमिन-बी समूह आणि लोह (आयन), मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मिळतात. जवच्या पिठाची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे त्यातील बीटा-ग्लुकन आहे.

हा एक प्रकारचा विरघळणारा फायबर आहे, जो पाचन आणि चयापचय आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जवमधील बीटा-ग्लुकन अन्नाचे पचन आणि कार्बोदकांचे (Carbohydrates) शोषण होण्याचा वेग मंदावू शकतो. यामुळे जेवल्यानंतर ब्लड शुगरमध्ये वेगाने होणारी वाढ कमी होण्यास मदत होईल.

जवच्या पिठात असलेले फायबर पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. यामुळे वारंवार भूक लागण्याच्या आणि गरजेपेक्षा जास्त खाण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. जवमध्ये आढळणारा फायबर आतड्यांचे कार्य सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम मिळवून देतो. म्हणूनच याचे सेवन पुरेसे पाणी आणि संतुलित आहारासोबत केले पाहिजे.

Barley Health Benefits
Sahitya Sammelan Delhi | नवी दिल्ली येथे महिला शासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन: संमेलनाध्यक्षपदी लीना मेहेंदळे यांची निवड

जवमध्ये असलेला बीटा-ग्लुकन विरघळणारा फायबर एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो, ज्याचा हृदयाला मोठा फायदा होऊ शकतो. जवमध्ये ग्लूटेन असते, जे सिलियाक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो.

त्यामुळे त्यांनी जव खाण्यापासून पूर्णपणे दूर राहावे. ज्या लोकांना ग्लूटेनयुक्त पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो, त्यांनी सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. जवमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत, ते अचानक जास्त खाल्ल्याने गॅस, पोट जड होणे किंवा सूज येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.