

लंडन : ब्रिटनमधील 94 वर्षे वयाचे (94 year old grandfather) मारियो सान्ना हे 'बुढ्ढा होगा तेरा बाप' असेच जणू म्हणत म्हातारपणालाच वाकुल्या दाखवत आहेत. त्यांच्यासाठी जीम म्हणजेच व्यायामशाळा हे दुसरे घर आहे. माजी रेल्वे इंजिनिअर असलेल्या मारियो यांच्याकडे रेल्वे रुळांचे जाळे तयार करण्याची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांचे शरीर पूर्वीपासूनच पिळदार होते.
निवृत्तीनंतर त्यांनी जीममध्ये जाणे सुरू केले. त्यानंतर त्यांना फिटनेसची इतकी आवड निर्माण झाली की, ती वयाच्या 94 व्या वर्षीही (94 year old grandfather) कमी झालेली नाही. गेल्या तीस वर्षांपासून ते नियमितपणे जीममध्ये जातात व घाम गाळतात. जीममध्ये एकही मशिन असे नाही ज्याला त्यांचा हात लागलेला नसेल. त्यांच्या उत्साहामुळेच त्यांना 'सुपर मारियो' असेही म्हटले जाते.
सान्ना यांनी 1954 मध्ये ब्रिटिश रेल्वेसाठी नोकरी सुरू केली होती. (94 year old grandfather) तत्पूर्वी दोन वर्षे आधी ते इटलीतील सरदीनियातून ब्रिटनमध्ये आले होते. नोकरीच्या काळात त्यांना भरपूर शारीरिक कष्ट करावे लागत होते. वजनदार रूळ एका जागेवरून दुसर्या जागी हलवण्याचे कामही ते करीत असत. या श्रमामुळे त्यांचे शरीर तंदुरुस्त राहिले होते. 1990 च्या प्रारंभी ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना स्वतःला तंदुरुस्त होण्यासाठी वेगळा मार्ग चोखाळणे गरजेचे आहे, असे वाटले व त्यांनी जीमला जाणे सुरू केले.
डोळ्यांच्या समस्येमुळे ते हल्ली आठवड्यातून दोनवेळा म्हणजे सोमवारी आणि शुक्रवारी जीमला जातात. तत्पूर्वी ते रोजच जीमला जात असत. (94 year old grandfather) वयाच्या 94 व्या वर्षीही त्यांचा फिटनेस चांगला असून, ते लोकांसाठी प्रेरणादायी व्यक्ती बनले आहेत. जीममध्ये ते आपले पाय अधिक मजबूत करण्याकडे जास्त लक्ष पुरवतात. मजबूत पायांमुळेच आपण चालू-फिरू शकतो व जग पाहू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा :