Kala Azar : जीवघेण्या काळ्या आजारापासून भारत मुक्त | पुढारी

Kala Azar : जीवघेण्या काळ्या आजारापासून भारत मुक्त

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : भारताने प्रथमच काळा आजार (ब्लॅक फिव्हर) निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये प्रथमच एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशातील काळा आजारबाधित रुग्णसंख्येचे प्रमाण प्रति 10 हजार नागरिकांमागे एकपेक्षा खाली आणण्यात देशातील आरोग्य यंत्रणेला यश मिळाले आहे. (Kala Azar)

यापूर्वी 2015, 2017 आणि 2020 अशा तीन वेळेला भारत सरकार जागतिक आरोग्य संघटनेचे हे उद्दिष्ट साध्य करण्यात अपयशी ठरले होते. 2023 मध्ये त्याला यश मिळाल्याने एका गंभीर आजाराला लगाम घालण्यास भारत यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. (Kala Azar)

काळा आजार (Kala Azar) हा वाळूमाशांपासून संक्रमित होणारा आजार आहे. भारतात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांत या आजाराने बाधित रुग्ण सापडतात. त्यांच्या निर्मूलनासाठी या चार राज्यांमध्ये 633 विभागांत (ब्लॉक्स) हे रुग्ण आढळतात.

या आजारामध्ये प्लेबोटोमस अर्जेटिप्स या प्रवर्गात मोडणार्‍या मादी माशांद्वारे हा रोग प्रसारित होतो. यामध्ये अनियमित ताप, वजन कमी होणे, यकृत आणि प्लीहावर सूज येणे आदी लक्षणे दिसू लागतात. त्यावर योग्य वेळी इलाज केला नाही, तर 95 टक्के रुग्ण दगावण्याची शक्यता असते. भारतामध्ये मलेरियानंतर दुसर्‍या क्रमांकाचा हा जीवघेणा आजार समजला जातो.

Kala Azar : बांगला देशानेही गाठले लक्ष

ऑक्टोबर 2023 मध्ये भारताशेजारील बांगला देशाने जगात सर्वप्रथम काळ्या आजारातून मुक्त होण्याचा मान मिळविला. पाठोपाठ भारतानेही जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट गाठले आहे. तथापि, या संपूर्ण माहितीची (डाटा) जागतिक आरोग्य संघटनेकडून तपासणी होणे बाकी आहे. यामुळे काळा आजार मुक्तीच्या घोषणेसाठी भारताला काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button