चेन्नई : आपल्या देशात अनेक प्राचीन मंदिरे आहेत तशीच आधुनिक काळात बांधलेली अनेक सुंदर व भव्य मंदिरेही आहेत. Temple of Gold त्यामध्ये तामिळनाडूतील वेल्लोर येथील महालक्ष्मी सुवर्ण मंदिराचा समावेश होतो. 101 एकर जागेवर उभारलेले हे सुवर्णमंदिर तयार करण्यासाठी 1500 किलो सोनं लागलं ज्याची किंमत 300 कोटींपेक्षा जास्त आहे.
मंदिराच्या कळसापासून खांबांपर्यंत आणि पायापासून गाभार्यापर्यंत सगळं सोन्याचं बनवलेलं आहे. इथं आल्यावर नजर जाईल तिथपर्यंत सोनचं सोनं दिसतं. मंदिराच्या भिंती सोन्याच्या, मंदिराचे सर्व खांब सोन्याचे, Temple of Gold मंदिराची चौकट सोन्याची आणि मंदिरातील देवीची मूर्तीही सोन्याचीच. देशातील हे नवीन सुवर्णमंदिर शंभर-सव्वाशे नाही, तर चक्क 1500 किलो सोन्यापासून तयार करण्यात आले आहे. जगातील हे एकमेव मंदिर असावं जिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं वापरलेलं आहे.
सकाळी सूर्याची पहिली किरणं पडताच मंदिर झळाळून निघतं आणि रात्रीच्या वेळी हजारो विद्युत दीपांनी मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. Temple of Gold तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात श्रीपूरम येथे संपूर्ण सोन्यानं तयार केलेलं हे महालक्ष्मी नारायणी मंदिर आहे. चेन्नईपासून श्रीपेराम्बुदूर, कांचीपूरममार्गे 175 किलोमीटरवर वेल्लोर आहे. तिरुपतीहून 120 किलोमीटर अंतरावर दक्षिण भारतातील हे एकमेवाद्वितीय सुवर्णमंदिर आहे. हे मंदिर पाहण्यासाठी, तसेच माता महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दररोज किमान 25 हजार भाविक येथे येतात. हे मंदिर बनविण्यासाठी तांब्याच्या हजारो प्लेटस्वर सोन्याचे नऊ ते दहा थर देण्यात आले आहेत. 7 वर्षे दररोज 800 कामगार हे मंदिर तयार करण्यासाठी काम करीत होते. मंदिराच्या दर्शनी भागात देशातील प्रमुख नद्यांचे पाणी आणून 'तीर्थम सरोवर' बनवलेले आहे. मंदिराच्या प्रवेशमार्गावर हिरवागार बगीचा फुलविण्यात आला आहे. 20 हजार प्रकारच्या नैसर्गिक औषधी आणि फुलांच्या रोपांनी, वृक्षांनी आणि झाडांनी हा बगीचा समृद्ध झालेला आहे. या मंदिरातली महालक्ष्मीची मुख्य मूर्ती 70 किलो सोन्यातून तयार केलेली आहे.
हेही वाचा :