Earth’s core : आर्श्चयच! चक्क पृथ्वीच्या गाभ्यालाच लागली गळती; शास्त्रज्ञांचा दावा | पुढारी

Earth’s core : आर्श्चयच! चक्क पृथ्वीच्या गाभ्यालाच लागली गळती; शास्त्रज्ञांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाण्याच्या टाकीला गळती लागणे, बदली गळणे, समुद्रातील एखाद्या जहाजाल गळती लागणे असे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल. पण चक्क पृथ्वीच्या गाभ्याला गळती लागल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. यामुळे पृथ्वीच्या गाभ्यातून हेलियन ३ प्रकारचा दुर्मिळ वायू पृथ्वीतून बाहेर येत आहे. कॅनडा येथील बाफिन आयलँड येथे काही ज्वालामुखी खडकात हा वायू प्रमाणापेक्षा जास्त आढळून आला आहे. ही बातमी CNNने दिली आहे.

Earth’s core :…तर पृथ्वीची निर्मिती कशी होत गेली, यावर प्रकाश पडेल

पृथ्वीच्या वातावरणात हेलियम ४ हा वायू सामान्य आहे, तर हेलियम ३ हा वायू दुर्मिळ मानला जातो. बाफिन येथे पूर्वी ज्या प्रमाणात हेलियम ३ मिळायचा त्यापेक्षा किती तरी जास्त प्रमाणात आढळून आला आहे. या संदर्भातील रिसर्च पेपर नेचर या जगप्रसिद्ध नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. वूडस होल ऑशिऑनोग्राफिक इन्स्टिट्यूशन या संस्थेतील संशोधक फॉरेस्ट हॉर्टन यांनी केले आहे. “हेलियम ३ पृथ्वीवर दुर्मिळ आहे, कारण त्याची निर्मिती पृथ्वीवर केली जात नाही. हा वायू अवकाशात आढळतो. पृथ्वी थंड होण्याची प्रक्रिया सुरू असताना हा वायू पृथ्वीवरून अवकाशात पोहोचला.”पृथ्वीच्या गाभ्यातून होत असलेल्या गळतीचा अभ्यास केला तर पृथ्वीची निर्मिती कशी होत गेली, यावर प्रकाश पडेल, असे ते सांगतात.

वैज्ञानिक खजिना

पृथ्वीच्या रचनेचा अभ्यास केला तर पृथ्वी कशा प्रकारे निर्माण झाली असेल यावर प्रकाश पडतो. हेलियम ३ची गाभ्यातून गळती होणे याचा अर्थ पृथ्वीची निर्मिती ही सोलर नेब्युलामध्ये झालेली आहे, या सिद्धांताला बळकटी मिळते. सोलर नेब्युला हा धूळ आणि वायूंनी बनलेला आहे. या वायूंत हेलियम ३चाही समावेश आहे.

हेही वाचा

 

Back to top button