Chandrayan 3 : ‘चांद्रयान 3’ ने पाठवले पृथ्वी, चंद्राचे फोटो | पुढारी

Chandrayan 3 : 'चांद्रयान 3' ने पाठवले पृथ्वी, चंद्राचे फोटो

श्रीहरीकोटा; वृत्तसंस्था : ‘चांद्रयान 3’चा चंद्राच्या दिशेने प्रवास व्यवस्थित सुरू अंतराळातून पृथ्वी आणि चंद्र कसे दिसतात याची चांद्रयानाने काढलेली दोन मोहक छायाचित्रे गुरुवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे प्रसिद्ध केली आहेत.

लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेर्‍याद्वारे ही छायाचित्रे काढण्यात आली आहेत. हा लँडर इमेजर कॅमेरा अहमदाबादमधील स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर आणि बंगळूरमधील इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टीम्सच्या प्रयोगशाळेने विकसित केला आहे. दरम्यान, चांद्रयानाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा 14 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. सध्या यानाचा प्रवास सुरळीत सुरू असून इस्रोचे शास्त्रज्ञ त्यावर बंगळूर येथील नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवून आहेत.

हे ही वाचा :

Back to top button