Super Blue Moon 2023 : आज आहे ‘सुपर ब्लू मून’; खरोखरच चंद्र निळा दिसणार का? जाणून घ्या सविस्तर… | पुढारी

Super Blue Moon 2023 : आज आहे 'सुपर ब्लू मून'; खरोखरच चंद्र निळा दिसणार का? जाणून घ्या सविस्तर...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Super Blue Moon 2023 : श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा आजचा सण आणखीनच खास होणार आहे. खगोलप्रेमींसाठी तर आज मोठी पर्वणीच असणार आहे. या पौर्णिमेला सुपर मून दिसणार असून ब्लू मून दिसण्याची ही शक्यता आहे. विशेष करून भारतीयांसाठी ही घटना चंदेरी पर्व ठरणार आहे. रक्षाबंधन-नारळी पौर्णिमेचा सण, चांद्रयान ३ चे विक्रम लँडर आणि रोव्हर हे प्रत्यक्ष चंद्रावर आहे. या काळातच आज पृथ्वीवरून आपल्याला पौर्णिमेचा चंद्र खूपच वेगळा आणि सूंदर दिसणार आहे. आज या वर्षातील शेवटचा सूपर मून आहे तसेच ब्लू मून ही दिसण्याची शक्यता आहे. जाणून घेऊ काय आहे सूपर मून आणि ब्लू मून

Super Blue Moon 2023 : सुपरमून काय आहे?

जेव्हा आपल्याला सूपरमून पाहायला मिळतो तेव्हा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आलेला असतो. यावेळी चंद्र हा नेहमीपेक्षा १४ पट अधिक मोठा दिसतो. तसेच याचा प्रकाश देखील या दिवशी अधिक असतो. दरवर्षी ठाराविक काळात चंद्र हा पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ येत असतो. त्यामुळे चंद्र नेहमी पेक्षा मोठा दिसतो. ही एक विशेष खगोलीय घटना असते. या वर्षी ऑगस्ट महिन्यातील दोन्ही पौर्णिमांना हे सूपरमून दिसणार आहे. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर एका ठाराविक मर्यादेत कमी जास्त होत राहते. सामान्यपणे हे अंतर पृथ्वीपासून ३.६० किलोमीटर ते ४ लाख किलोमीटर इतके असते.

या वर्षी जुलैमध्ये २-३ तारखेला आणि १ ऑगस्टला सुपरमून दिसले होते. दोन आणि तीन तारखेच्या सूपरमून वेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३ लाख ६१ हजार ९३४ किमी इतके होते. तर १ तारखेला जेव्हा सूपरमून दिसले होते त्यावेळी चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ५७ हजार ५३० किमी इतक्या अंतरावर होता.

Super Blue Moon 2023 : आज रक्षाबंधनाचा चंद्र असणार खूपच खास

जुलैमध्ये आणि 1 ऑगस्टला दिसलेल्या सुपरमून पेक्षा आजच्या राखी पौर्णिमेचा चंद्र हा आणखी जास्त मोठा आणि सुंदर असणार आहे. कारण गेल्या दोन्ही वेळे पेक्षा चंद्र पृथ्वीच्या आणखी जवळ असणार आहे. 30 ऑगस्टला चंद्र ३ लाख ५७ हजार ३४४ किमी अंतरावर असणार आहे. तर पुढील महिन्यात 28-29 सप्टेंबरला येणाऱ्या पौर्णिमेला पुन्हा सुपरमून दिसणार आहे. मात्र, त्यावेळी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३ लाख ६१ हजार ५५२ किमी असणार आहे.

त्यामुळे 30 ऑगस्टचा राखी पौर्णिमेच्या दिवशी दिसणारे सूपरमून सर्वात मोठे आणि सूंदर असणार आहे. तसेच यावेळी भारताने राबवलेली चांद्र मोहीम याच काळात राबवली. जेणेकरून चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने कमी कालावधीत चांद्रयानाला चंद्रावर पाठवता येईल. सध्या चांद्रयान 3 ने पाठवलेले विक्रम लँडर आणि रोव्हर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुव शिव शक्ती पॉइंटवर आहे.

Super Blue Moon 2023 : आज दिसणार ब्लू मून

यावेळचे रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा ही आणखी खास ठरणार आहे कारण आज सुपरमून सह ब्लू मून देखील दिसणार आहे. आजच्या चंद्रबिंब हे नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या रंगात दिसणार आहे. अंतराळात अनेक खगोलीय घटना घडत असतात. त्यापैकी चंद्र आपल्या जवळ असल्याने फुल मून, सुपर मून, न्यू मून आणि ब्लू मून, ब्लड मून चंद्रग्रहण अशा वेगवेगळ्या घटना दर वर्षी किंवा दोन-तीन वर्षातून एकदा पाहायला मिळतात. ब्लू मून ही देखील अशाच खगोलीय घटनांपैकी आहे. आज 30 ऑगस्टच्या पौर्णमेला हे ब्लू मून दिसणार आहे. जाणून घेऊ काय आहे ब्लू मून? ते कधी दिसते? ब्लू मून म्हणजे चंद्र खरोखरच निळा दिसतो का?

Super Blue Moon 2023 : ब्लू मून कधी आणि का होते?

जेव्हा एका महिन्यात दोन पौर्णिमा येतात, तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून म्हणतात. हे आकाराने तर थोडे मोठे असतेच, शिवाय त्याचा रंगही थोडासा वेगळा असतो. तर कधी-कधी एखाद्या वर्षात दोन किंवा दोनपेक्षा जास्त महिन्यात दोन पौर्णिमा येतात. अशावेळी त्या वर्षात दोन किंवा तीन वेळा ब्लू मून दिसते. अशा वर्षाला मून इयर म्हटले जाते. २०१८ मध्ये जानेवारी आणि मार्च महिन्यात दोन – दोन पौर्णिमा आल्या होत्या. त्यामुळे २०१८ हे वर्ष मून इयर ठरले होते.

Super Blue Moon 2023 : ब्लू मून दर २ किंवा ३ वर्षांनी का होतो?

सामान्यपणे सौरकालगणना आपण व्यवहारात वापरतो. तर चांद्र कालगणना या सण उत्सवासाठी वापरतो. चांद्र कालगणना आणि सौरकालगणना यांमध्ये फरक आहे. सौर कालगणनेत एका वर्षात ३६५ दिवस असता. कारण पृथ्वीची सुर्याभोवतीची प्रदक्षिणा इतक्या कालखंडात पूर्ण होते. तर चार वर्षातून एकदा ३६६ दिवस येतात. मात्र चांद्र कालगणनेत सामान्यपणे ३५५ दिवस असतात. चंद्र २९.५३ दिवसांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्यामुळे पृथ्वीची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा आणि चंद्राची पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा यांच्या कालावधीनुसार ११ दिवसांचा फरक असतो.

एका वर्षात ३६५ दिवस असतात. या हिशोबाने चंद्र एका वर्षात पृथ्वीभोवती १२.२७ प्रदक्षिणा मारतो. पृथ्वीवर एका वर्षात १२ महिने असतात आणि प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा असते. याप्रमाणे प्रत्येक कॅलेंडर वर्षात चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या १२ वेळा पूर्ण परिक्रमा करूनही ११ दिवस जास्त असतात आणि प्रत्येक वर्षी या अतिरिक्त दिवसांना जोडले तर दोन वर्षांत ही संख्या २२ आणि तीन वर्षांत ३३ असते. यामुळे दर २ किंवा ३ वर्षांनी एक स्थिती निर्माण होते, ज्यामध्ये एक अतिरिक्त पौर्णिमा येते. यावेळी चंद्र अधिक मोठा आणि रंगानेही वेगळा दिसतो त्यामुळे या पौर्णिमेला ब्लू मून म्हटले जाते.

Super Blue Moon 2023 : ब्लू मून म्हणजे चंद्र निळ्या रंगात दिसणार का?

ब्लू मूनचा अर्थ चंद्र निळा दिसेल असा नाही. परंतु कधीकधी वातावरणीय घटनांमुळे चंद्राचा रंग निळा दिसू शकतो. तथापि, प्रत्येक ब्लू मून निळा दिसेल असे आवश्यक नाही. एबीपी हिंदीने नॅचुरल हिस्ट्री म्युझियमचे शास्त्रज्ञ मार्टिन मेंगलन यांनी ब्लू मून विषयी दिलेल्या माहितीविषयी सांगितले आहे. मार्टिन यांनी म्हटले आहे चंद्राचा नेहमीचा प्रकाश हा सूर्यापासून बदललेला पांढरा प्रकाश असतो. परंतू जेव्हा मार्गात एखादी गोष्ट असेल जी लाल प्रकाशाला रोखते तर अशा वेळी चंद्र निळा देखील दिसू शकतो. मात्र, हे खूपच दुर्मिळ असून असे ज्वालामुखीच्या विस्फोटानंतर होऊ शकते. त्यामुळे ब्लू मून हे नाव असले तरी चंद्र निळ्या रंगाचा दिसेलच असे नाही. मात्र या प्रकाशाचा रंग नेहमी पेक्षा थोडा वेगळा असतो.

Super Blue Moon 2023 : आजच ब्लू मून पाहा नंतर २०२६ मध्येच ब्लू मून दिसणार

यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन पौर्णिमा आल्या आहेत. त्यापैकी ३० ऑगस्टला येणारी पौर्णिमा ही दुसरी पौर्णिमा आहे. त्यामुळे या पौर्णिमेला ब्लू मून दिसणार आहे. किंवा या पौर्णिमेला ब्लू मून असे म्हटले आहे. सप्टेंबर महिन्यातील पौर्णिमेला सुपरमून दिसणार असले तरी ते या आजच्या 30 ऑगस्टच्या पौर्णिमेपेक्षा थोडे लहान असणार आहे. तसेच ते फक्त सूपरमून असेल ब्लू मून नसणार आहे. त्यामुळे आज रात्रीचा चंद्र वर्षातील सर्वात मोठा आणि सर्वात चमकदार चंद्र असेल.

३० ऑगस्टच्या रात्री ८ वाजून ३७ मिनिटे (EDT) रोजी ब्लू मून सर्वात जास्त चमकदार असेल. हा नजारा खरोखरच मनोरंजक असेल कारण यानंतर तीन वर्षांनी २०२६ मध्ये ब्लू मून पाहिला जाऊ शकेल.

हे ही वाचा :

Back to top button