UN Security Council : UN सुरक्षा परिषदेसाठी ‘या’ पाच राष्ट्रांची निवड

 UN Security Council :
 UN Security Council :

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ( UN ) मंगळवारी अल्जेरिया, गयाना, सिएरा लिओन, स्लोव्हेनिया आणि दक्षिण कोरिया या पाच राष्ट्रांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी १ जानेवारी २०२४ पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी निवड केली आहे. वाचा सविस्तर बातमी

एएनआय या वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार १ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार्‍या दोन वर्षांच्या कालावधीसाठी UN सुरक्षा परिषदेसाठी  अल्जेरिया, गयाना, कोरिया प्रजासत्ताक, सिएरा लिओन आणि स्लोव्हेनिया या पाच राष्ट्रांची  निवड झाली आहे. यासंबंधी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या ७७ व्या सत्राच्या अध्यक्षा कासाबा कोरोसी यांनी ट्विट केले आहे.

UN संस्थेमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे आवाहन

UN मध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी गुरुवारी,' संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) ची सध्याची रचना  बहुध्रुवीय जगाच्या वास्तविकतेशी जुळत नाही, असे सांगून UN संस्थेमध्ये तातडीने सुधारणा करण्याचे आवाहन केले. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलमधील सुधारणा हा एक गंभीर मुद्दा आहे ज्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, जग दिवसेंदिवस विकसित होत आहे आणि जागतिक शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी अधिक प्रातिनिधिक, सर्वसमावेशक आणि परिणामकारक अशा परिषदेची गरज आहे,  असेही त्या म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 'UNSC च्या सुधारणा हा एक गंभीर मुद्दा आहे. ज्यावर दीर्घकाळ चर्चा झाली आहे आणि त्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news