President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा सुरिनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव | पुढारी

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा सुरिनामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव

पारामरिबो, वृत्तसंस्था : President Droupadi Murmu : भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा सुरिनामाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव करण्यात आला. रिपब्लिक ऑफ सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांच्या हस्ते मुर्मू यांना द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळवणार्‍या मुर्मू पहिल्या भारतीय ठरल्या आहेत.

यानंतर मुर्मू म्हणाल्या, या पुरस्काराने मी खूपच भारावून गेले आहे. हा केवळ माझा नाही, तर तमाम 140 कोटी भारतीय जनतेचा गौरव आहे. यावेळी भारतीय सुरिनाम पोहोचल्याच्या घटनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात मुर्मू यांनी सहभाग घेतला. दरम्यान, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी राष्ट्राध्यक्ष संतोखी यांची भेट घेतली.

यावेळी दोघांच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान चार सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या. या करारांनुसार दोन्ही देश कृषी, आरोग्यसह अन्य क्षेत्रांत सहकार्य वाढवणार आहेत. दरम्यान, मुर्मू सोमवारी सुरिनामची राजधानी पारामरिबो विमानतळावर पोहोचल्या. यावेळी त्यांचे राष्ट्राध्यक्ष संतोखी यांनी पूर्ण राजकीय सन्मानात स्वागत केले.

हे ही वाचा :

Hurricane Arabian Sea : अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरात केली पूजा, पाहा फोटो…

Back to top button