आरोग्‍य : शेवग्याच्या शेंगा त्वचा आणि केसांसाठीही लाभदायक

drum stik
drum stik

नवी दिल्ली : benefit of drumsticks : पावसाळ्याच्या सुरुवातीला, मृग नक्षत्रावेळी आपल्याकडे शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली जाते. मात्र, ती वर्षभरही खाणे लाभदायक ठरते. एरव्ही वर्षभर शेवग्याच्या शेंगांची आमटीही असतेच. संशोधकांनी म्हटले आहे की शेवग्याच्या शेंगा त्वचा आणि केसांसाठीही लाभदायक असतात. पोटासंबंधीच्या समस्याही या शेंगांनी दूर होतात.

शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये एक विशिष्ट पोषक तत्त्व असते ज्यामुळे यकृतावरील सूज कमी होण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांनी धमन्यांमधील बॅड कोलेस्टेरॉलही कमी होण्यास मदत मिळते. संशोधनानुसार शेवग्याच्या शेंगांचे नियमित सेवन केल्यास कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लायसेराइडचा स्तर कमी होतो. शेवग्याच्या शेंगांमधील अँटी-इन्फ्लेमेटरी घटकांमुळे रुमेटाईड अर्थरायटिसला रोखण्यास मदत मिळते. रक्तातील शर्करेचे प्रमाण तसेच इन्सुलिनचा स्तर योग्य ठेवण्यासही शेवग्याच्या शेंगा उपयुक्त आहेत. रक्तदाब नियमित ठेवण्यासाठीही या शेंगा गुणकारी ठरतात.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news