ISRO Launch satellite : NVS-01 उपग्रहाचे इस्त्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; जाणून घ्या काय आहे मोहिमेची वैशिष्ट्ये

ISRO Launch satellite : NVS-01 उपग्रहाचे इस्त्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; जाणून घ्या काय आहे मोहिमेची वैशिष्ट्ये

पुढारी ऑनलाईन: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोकडून सोमवारी (दि.२९) सकाळी १०. ४५ वाजता NVS-1 या प्रगत नेव्हिटिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.  श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्टेशनवरून GSLV-F12/NVS-01 या उपग्रहाचे आज सकाळी यशस्वी प्रक्षेपण झाले. हे इस्त्रोचे या वर्षातील चौथे प्रक्षेपण आहे. अचूक वेळेची सुविधा, रेंज आणि जलवाहतूक क्षमता प्रदान करणे ही या उपग्रहाची प्रमुख्य वैशिष्टये आहेत.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, NVS-01 हा नेव्हिटिगेशन उपग्रह सुमारे 2232 किलो वजनाचा असून, तो जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) रॉकेटद्वारे लॉन्च करण्यात आला आहे. या वर्षातील हे पहिलेच GSLV मिशन आहे. हा उपग्रह वाहून नेणारे तीन-टप्पे असणार आहेत, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोकडून देण्यात आली आहे.

नॅव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन (NavIC) ही ISROने विकसित केलेली प्रादेशिक नेव्हिगेशन सॅटेलाइट प्रणाली आहे. NVS-01 हा बेंगळुरु येथील ISRO च्या UR राव उपग्रह केंद्राने बांधलेल्या दुसऱ्या आवृत्तीमधील नेव्हिगेशन उपग्रहांच्या मालिकेतील पहिला आहे. उपग्रहांची पूर्वीची NavIC मालिका IRNSS (इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम) म्हणून ओळखली जात होती. हे दोन प्रकारच्या सेवा प्रदान करते – स्टँडर्ड पोझिशनिंग सर्व्हिस (SPS) जी सर्व यूजर्संना प्रदान केली जाते आणि प्रतिबंधित सेवा (RS), जी फक्त अधिकृत यूजर्संना प्रदान केलेली एनक्रिप्टेड सेवा आहे. इस्रोच्या सध्याच्या आठ NavIC उपग्रहांची मालिका PSLV रॉकेट वापरून 2013 ते 2018 दरम्यान टप्प्याटप्प्याने कक्षेत पाठवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news