उंटाच्या मदारीत काय असते? | पुढारी

उंटाच्या मदारीत काय असते?

नवी दिल्ली ः निसर्गाने प्रत्येक जीवाला काही ना काही देणगी दिलेली आहे.(camel)  एखादा प्राणी ज्या पर्यावरणात राहतो तेथे तो तग धरून राहावा, त्याचे संरक्षण व आहाराची सोय व्हावी यासाठी निसर्गाने या देणग्या दिलेल्या असतात. ‘वाळवंटातील जहाज’ असलेल्या उंटालाही(camel) निसर्गानेच अशाच देणग्या दिलेल्या आहेत. तप्त वातावरण आणि वाळवंटात राहण्यासाठी योग्य असे शरीर उंटाला मिळालेले आहे. आपण उंटाला पाहिलं तर पहिलं लक्ष त्याच्या पाठीवरील ़एक किंवा दोन उंच मदारींकडे (कुबड) जाते.

याबाबत अनेक गैरसमजही आहेत. उंटांची (camel) मदार ही पाणी साठवण्यासाठी असतात, ज्याच्या मदतीने ते पाण्याशिवाय आठवडे घालवतात, असं म्हटलं जातं. मात्र, हे चुकीचं आहे. खरं तर उंटाच्या मदारींमध्ये चरबी असते. ते मदारींमध्ये पाणी साठवत नाहीत. रोजच्या पाण्याशिवायही उंट ऊर्जावान असतात. उंट पूर्ण मदारींच्या मदतीने 4 ते 6 महिने घालवू शकतो. वाळवंटात अनेकदा आहार व पाणी मिळत नाही. अशावेळी स्वत:ला ऊर्जावान ठेवण्यासाठी उंट शरीराच्या मदारीत साठलेल्या चरबीचा आधार घेतात. एक उंट त्याच्या पाठीवरील मदारींमध्ये 37 किलो चरबी साठवू शकतो.

.हेही वाचा

कबाब खरेदी करण्यासाठी गेला आणि कोट्यधीश झाला!

उंच ठिकाणांवरून पडूनही मांजर कसे राहते सुरक्षित?  

दै. ‘पुढारी’तर्फे आयोजित कार्यक्रम : गीतरामायण’ प्रवेशिकेसाठी रसिकांचा मोठा प्रतिसाद 

गाय, वासरू आणि डीएनए

 

Back to top button