Eyes : ‘या’ कारणांमुळे फडफडतात डोळे!

Eyes : ‘या’ कारणांमुळे फडफडतात डोळे!

आपले डोळे (Eyes ) कधी ना कधी फडफडत असतातच. अनेकांनी त्यामध्ये 'शुभ-अशुभ' अशा गोष्टीही जोडलेल्या आहेत. 'माझा लवतोय डावा डोळा' अशी गाणीही बनलेली आहेत. मात्र, डोळे (Eyes)  फडफडण्याचे किंवा लवण्याचे वैज्ञानिक कारण अनेकांना ठावूक नसते. यामागे एक नव्हे तर अनेक कारणे असू शकतात. अशाच काही कारणांची ही माहिती…

डोळे कोरडे होणे

कोरडेपणामुळेही अनेकदा डोळे (Eyes) फडफडतात. याशिवाय अ‍ॅलर्जीमुळे किंवा डोळ्यांत जास्त पाणी येण्यामुळेही डोळे फडफडण्याची समस्या उद्भवू शकते.

पुरेशी झोप न होणे

तुमची पुरेशी झोप झाली नसेल तरीही ही समस्या दिसून येते. बराच वेळ जागे राहून पुस्तक वाचत राहिलात किंवा एखादा चित्रपट पाहत राहिल्यास झोप पूर्ण होत नाही. यामुळेही अनेकदा डोळे फडफडतात. यात कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवर जास्त वेळ घालवल्यामुळेही असे होऊ शकते.

स्नायूंसंबंधित समस्या

डोळ्यांच्या स्नायूंशी संबंधित काही समस्यांमुळेही वारंवार डोळे फडफडतात; पण जर तुमचे डोळे जास्त प्रमाणात फडफडत असतील तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. यात तुमच्या चष्म्याच्या नंबरमध्ये काही बदल झाला आहे किंवा होणार असेल हे समजू शकेल.

ताणतणाव

तणतणावाच्या परिस्थितीतही डोळे फडफडण्याची समस्या जाणवते. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल खूप चिंतेत असाल आणि सतत त्याबद्दल विचार करीत असाल तर त्यामुळे तणाव वाढतो आणि त्यामुळे तुमची डोळे फडफडण्याची समस्या वाढते. तणावामुळे अनेकदा झोपही पूर्ण होत नाही.

शरीरात मॅग्नेशियमची कमतरता

शरीरातील मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळेही अनेकदा डोळे फडफडू शकतात. याशिवाय चहा-कॉफी, अल्कोहोल किंवा ड्रग्जचे जास्त सेवन केल्यामुळेही ही समस्या दिसून येते.

-हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news