Gold plated dosa : चक्क सोने जडवलेला डोसा! | पुढारी

Gold plated dosa : चक्क सोने जडवलेला डोसा!

हैदराबाद : दक्षिण भारतातून आलेले अनेक खाद्यपदार्थ केवळ देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय झालेले आहेत. डोसा, इडलीसारखे हे अनेक पदार्थ आता आपल्याला घरात व जिभेवर रूळलेले आहेत. मात्र, तुम्ही कधी सोने जडवलेला डोसा पाहिला किंवा खाल्ला आहे का? हल्ली अनेक खाद्यपदार्थांमध्ये खाण्यास योग्य अशा सोन्याची सजावट केली जाते; पण डोशाबाबतही असे केले आहे याची अनेकांना कल्पना नसेल. हैदराबादमध्ये असा सोने जडवलेला (Gold plated dosa) डोसा मिळतो!

सर्वसाधारणपणे एका डोशाची किंमत 30 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत असते. मात्र, हा सोन्याचा डोसा खाण्यासाठी तुम्हाला एक हजार रुपये द्यावे लागतील. हैदराबादच्या बंजारा हिल्स परिसरातील एका रेस्टॉरंटमध्ये हा सोने लावलेला डोसा मिळतो. या ‘हाऊस ऑफ डोसा’मध्ये गोल्डन डोसा (Gold plated dosa) खाण्यासाठी अनेक लोक येतात. विशेषतः वीकेंडला तिथे मोठी गर्दी असते. हा स्पेशल डोसा आधी नेहमीसारखाच बनवला जातो व त्यानंतर त्याला 24 कॅरेट सोन्यापासून मढवले जाते. हे सोन्याचे आच्छादनच किंवा सोन्याचा वर्खच त्याला महागडे बनवते. या डोशामध्ये तळलेले काजू, बदाम, शुद्ध तूप, भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेल्या हरभरा डाळीची चटणी यांच्यासमवेत दिले जाते. ग्राहकाच्या ऑर्डरनुसार असा डोसा बनवला जातो व रेस्टॉरंटमध्ये रोज सरासरी सहा ते आठ गोल्डन डोसे बनवले जातात.

हेही वाचा : 

Back to top button