

नवी दिल्ली : आधुनिक काळात बाटलीतून विकतचे पाणीही मिळू लागले आहे. विशेषतः प्रवासात असे बाटलीबंद, शुद्ध पाणी उपयोगी पडते. मात्र, अशा पाण्याचीही 'एक्स्पायरी डेट' (Water Expiry date) असते का, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. अर्थातच पाण्याला कोणतीही 'एक्स्पायरी डेट' नसते! पाण्याच्या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट असते, ती पाण्याच्या बाटल्यांची असते. कारण पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या असतात आणि ठराविक वेळानंतर प्लास्टिकचे कण हळूहळू पाण्यात मिसळू शकतात. त्यामुळे बाटलीची ती एक्स्पायरी डेट असते.
हल्ली प्रत्येक गावात व शहरात बाटल्यांमध्ये पाणी विकले जाते. पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेटही लिहिलेली असते. त्यामुळेच पाण्याची एक्स्पायरी डेट नसते तर बाटल्यांवर का लिहिले जाते, असा प्रश्न अनेकांना पडतो. तज्ज्ञ सांगतात की, पाण्याच्या बाटल्यांवर लिहिलेली एक्स्पायरी डेट ही पाण्याची एक्स्पायरी डेट (Water Expiry date) नसून पाण्याच्या बाटल्यांची एक्स्पायरी डेट असते. कारण पाण्याच्या बाटल्या प्लास्टिकच्या असतात आणि ठराविक वेळानंतर प्लास्टिकचे कण हळूहळू पाण्यात मिसळू लागतात. यामुळेच ज्या बाटल्यांमध्ये पाणी भरले आहे, त्या बाटल्यांबद्दल ती तारीख लिहिलेली असते. आता पाण्याचीही एक्स्पायरी डेट असते की नाही, हा प्रश्न येतो. याचे उत्तर नाही, पाण्याची एक्स्पायरी डेट नाही. अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पाणी शुद्ध केले जाते. तथापि, असे निश्चितपणे सांगितले जाते की जर पाणी जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवले असेल तर ते पिण्यापूर्वी ते स्वच्छ करणे किंवा शुद्ध करणे आवश्यक आहे.
हेही वाचा :