Dog walker : कुत्र्यांना सोबत घेऊन फिरला, वर्षभरातच कोट्यधीश बनला! | पुढारी

Dog walker : कुत्र्यांना सोबत घेऊन फिरला, वर्षभरातच कोट्यधीश बनला!

वॉशिंग्टन : छोटीशी कल्पना एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलवून मेहनतीच्या जोरावर त्याला करोडपती बनवू शकते. अमेरिकेतील एका शिक्षकाबाबत नेमके असेच घडले आहे. मायकेल जोसेफ असे त्याचे नाव. त्याला चांगली शिक्षकाची नोकरी होती; मात्र तिथे त्याचे मन रमले नाही. पठ्ठ्याने या नोकरीला रामराम ठोकला आणि चक्क कुत्र्यांना फिरवण्याचे काम पत्करले. ( Dog walker ) त्याला सुरुवातीला लोकांनी वेड्यात काढले; मात्र याच बिझनेस आयडीयामुळे आज तो कोट्यधीश बनला आहे.

अशी सूचली Dog walker’ बिजनेसची कल्पना

2019 मध्ये मायकलने पार्ट टाईम डॉग वॉकर म्हणून काम केले. तो जेव्हा कुत्र्यांना उद्यानात फिरायला घेऊन जायचा तेव्हा तिथे येणारे इतर लोक नेहमी म्हणायचे की कुत्रे प्रत्येक गोष्टीत मायकेलची आज्ञा पाळतात. दरम्यान, एका व्यक्तीने त्याला गमतीने विचारले की, तू कुत्र्यांना फिरवण्याचे काम का नाही करत? यानंतर मायकलला ‘डॉग वॉकर’ बिजनेसची कल्पना सुचली आणि शिक्षकाची नोकरी सोडून ‘डॉग वॉकर’ बनलासुद्धा. नंतर तो पूर्णवेळ कुत्रा फिरवण्याचे काम करू लागला.

कुत्रे फिरवण्याचा नवा व्यवसाय सुरू केला

‘डॉग वॉकर’ म्हणून काम करत मायकलने   तःची कंपनी स्थापन केली आहे. शिवाय लोकांचे कुत्रे फिरवण्यासाठी अनेकांना कामावर ठेवून रोजगारनिर्मितीही केली आहे. न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. मायकल जेव्हा शिक्षकाची नोकरी करत होता तेव्हा त्यांची वार्षिक कमाई होती केवळ 30 लाख रुपये. मात्र, शिक्षकाची नोकरी सोडून त्याने सुरू केलेल्या या नवीन व्यवसायातून तो वर्षाला एक कोटीची कमाई करत आहे. ब्रुकलिन हे त्याचे मूळचे गाव. या नव्या व्यवसायाच्या कमाईतून त्याने न्यू जर्सीमध्ये आलिशान घर खरेदी केले आहे. त्याच्याकडे स्वतःची कारदेखील आहे.

जेव्हा एकट्याला हा व्याप सांभाळणे कठीण आहे असे दिसले तेव्हा त्याने पार्कसाइड पप्स नावाची कंपनी सुरू केली. यातून त्याने लोकांची पाळीव कुत्री फिरवायला सुरुवात केली. अनेकांनी त्याच्या कंपनीकडून सेवा घेतली. अमेरिकेत बहुतांश लोक कुत्रे पाळतात. मात्र, वेळेअभावी त्यांना या कुत्र्यांना घराबाहेर फिरवणे जमत नाही. अशा लोकांच्या कुत्र्यांना मायकल फिरवून आणतो. मायकलने आपल्या कंपनीचे अ‍ॅपदेखील तयार केले आहे. त्याची कंपनी कुत्र्यांना फिरवण्याबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंगही देते. डॉग वॉकिंगसाठी दर तासाला त्याची कंपनी 2000 ते 2500 रुपये शुल्क आकारते. कुत्र्यांना ट्रेनिंग देण्याचा दर आहे प्रतितास 5 हजार रुपये.

हेही वाचा :

Back to top button