Video : याला म्‍हणतात 'फिरकी' घेणे...कुलदीपच्‍या 'स्‍पिन'ने मिशेलची 'दांडी गुल' | पुढारी

Video : याला म्‍हणतात 'फिरकी' घेणे...कुलदीपच्‍या 'स्‍पिन'ने मिशेलची 'दांडी गुल'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि  न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात फिरकीपटूंची जादू क्रिकेटप्रेमींनी अनुभवली. या सामन्‍यात भारताने न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव केला. मात्र हा विजय मिळवण्यासाठी भारतीय फलंदाजांची मेहनत घ्यावी लागली. अखेरच्‍या षटकातील पाचव्‍या चेंडूवर भारताने १०० धावांचे लक्ष्‍य पार केले. ( Kuldeep Yadav unplayable delivery )

सूर्यकुमारच्‍या फलंदाजीने सामना जिंकला असली तरी त्‍यापूर्वी भारतीय गोलंदाजांनी विशेषत: फिरकीपटूंनी न्‍यूझीलंडच्‍या फलंदाजांना अक्षरक्ष: नाचवले. या सामन्‍यात कुलदीप यादवने पुन्हा एकदा आपल्‍या फिरकीची जादू दाखवली. त्‍याच्‍या
स्‍पिनने न्‍यूझीलंडचे फलंदाज आवाक झाले. कुलदीपच्‍या गोलंदाजीवर डॅरिल मिशेलला ज्या पद्धतीने बाद झाला, याचा व्‍हिडीओ सध्‍या सोशल मीडियावर तुफान व्‍हायरल होत आहे.

 कुलदीपच्‍या ‘फिरकी’समोर मिशेल हतबल

दहावे षटक कुलदीपने टाकले. या षटकातील शेवटचा चेंडू त्‍याने ऑफ-स्टंपच्या रेषेवर टाकला. मिशेलला स्वतःवर नियंत्रण ठेवायला थोडा वेळ लागला; पण खेळपट्टीवर आदळल्यानंतर चेंडू इतका वळेल, अशी अपेक्षा त्‍याला नव्हती. सारं काही एका क्षणात घडलं आणि हा चेंडू एका कोनात थेट स्टंपमध्ये घुसला. डॅरिल मिशेलला सावरण्‍याची संधीच मिळाली नाही. कुलदीपच्‍या फिरकीने मिशेलची दांडी गुल झाली. तो केवळ ८ धावा करु शकला. कुलदीप टाकलेला हा चेंडू संपूर्ण सामन्‍यातील सर्वात्‍कृष्‍ट स्‍पिन ठरला. ( Kuldeep Yadav unplayable delivery )

प्रथम फलंदाजी करताना न्‍यूझीलंडने २० षटकांमध्‍ये ९९ धावा केल्‍या. भारताच्‍या गोलंदाजीत अर्शदीप सिंगने दोन तर हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, चहल, दीपक हुडा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्‍येकी एक विकेट घेतली. सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत २६ धावा केल्या. विशेष म्‍हणजे त्‍याच्‍या या खेळीत केवळ एका चौकाराचा समावेश होता. भारताने १९.५ षटकांमध्‍ये १०० धावांचे लक्ष्‍य साध्‍य करत मालिकेत बरोबरी साधली.

 

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button