Viral video : 'त्‍याची' आणि शार्कची झाली टक्कर; शार्क चावणार इतक्यात... | पुढारी

Viral video : 'त्‍याची' आणि शार्कची झाली टक्कर; शार्क चावणार इतक्यात...

पुढारी ऑनलाईन डेस्क : समुद्रामध्‍ये एक पाणबुड्या पाण्यात असताना अचानक समोरून  शार्क वेगाने येतो आणि त्‍याच्‍या डोक्याला टक्कर देऊन पुढे जातो. या जीवघेणा थरार अनुभवता येणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही थरारक घटना पाहताना अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही.

एक भयानक सामना…

हा व्हिडीओ ऑडली टेरिफायिंगने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये तो म्हणतो, “पाण्यातील खराब दृश्यमानतेमुळे पाणबुड्या आणि शार्क यांच्यातील एक भयानक सामना.” खरंच, व्हिडीओ पाहताना या घटनेच्या भयानकतेची जाणीव होते. कारण शार्क समोरून येताना तोंड उघडून आलेला दिसून येतोय. याचा अर्थ तोपाणबुड्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानेच आला असावा, हे स्‍पश्‍ट होते. याचवेळी पाण्याच्या कमी दृश्यमानतेमुळे पाणबुड्याला शार्क जवळ येईपर्यंत दिसून आला नाही. केवळ काही क्षणात त्‍यांच्‍यावर जीवघेणे संकट येते मात्र तो यामधून सुदैवाने बचावतो. जीवघेवा अनुभव कथन करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल होत आहे.

हे वचलंत का? 

 

Back to top button