Plane : विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय?

विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय?
विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय?
Published on
Updated on

काठमांडू : विमान (Plane) अपघात झाल्यावर विमानातील 'ब्लॅक बॉक्स'चा शोध घेतला जातो व त्याच्या सहाय्याने अपघाताचे नेमके कारण शोधले जात असते. या ब्लॅक बॉक्समध्ये असं काय असतं, ज्या माध्यमातून अपघाताचं कारण कळतं, तो ब्लॅक बॉक्स कोणत्या रंगाचा असतो, या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

ब्लॅक बॉक्स हे विमानात (Plane) असलेलं एक डिव्हाईस किंवा उपकरण आहे. ते एअरक्राफ्ट व फ्लाइट पॅरामीटर्सच्या परफॉर्मन्सची नोंद ठेवतं. त्यात इतर अनेक फॅक्टर्स रेकॉर्ड होतात. हा बॉक्स एअरस्पीड (वेग), अल्टिट्यूड (उंची) आणि फ्युएल फ्लो (इंधन) याबाबतच्या नोंदी करते. यामध्ये दोन काँपोनंट्स असतात. एक काँपोनंट फ्लाइट डेटा रेकॉर्डर व एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असतो. सीव्हीआर कॉकपिटमधील संवाद रेकॉर्ड करतो. यामध्ये पायलट्सचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी होणारा संवाद रेकॉर्ड केला जातो. सीव्हीआरमध्ये फक्त दोन तासांचं कॉकपिट रेकॉर्डिंग होऊ शकतं. एका फिक्स टाइमने त्याला नवीन डेटासह रिप्लेस केलं जातं. तर, एफडीआरमध्ये 25 तासांपर्यंतचा फ्लाइट डेटा स्टोअर होतो.

ब्लॅक बॉक्स साधारणपणे विमानाच्या (Plane) मागील बाजूस बसवला जातो. हा सर्वांत कमी प्रभावित भाग असल्याने तो अपघातात वाचतो, असं म्हटलं जातं. हा बॉक्स खूप टिकाऊ असतो आणि 3,400 जीएस किंवा ग्रॅव्हिटेशनल अ‍ॅक्सलरेशनमध्येही टिकू शकतो. तसेच तो 1100 अंश सेल्सिअस तापमान आणि 20,000 फूट डेप्थ अंडर वॉटर प्रेशर सहन करू शकतो. ब्लॅक बॉक्स फक्त नावापुरताच ब्लॅक असतो, वास्तवात त्याचा रंग नारंगी (ऑरेंज) असतो. ब्लॅक बॉक्स शोधून विमान योग्य उंचीवर उडत होतं की नाही, याचा शोध घेतला जातो. तसेच ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर फ्लाइट उडवताना पायलटला लो फ्युएल किंवा कम्युनिकेशनमध्ये कोणती अडचण आली होती का, याबद्दलही कळतं. याच्या आधारे अपघाताचं कारण निश्चित करता येऊ शकतं व त्यामुळे पुढे काळजी घेता येते.

-हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news