Twins : ‘ते’ जुळेच, पण दोघांचे वडील वेगवेगळे! | पुढारी

Twins : ‘ते’ जुळेच, पण दोघांचे वडील वेगवेगळे!

रिओ डी जनैरो : कधी कधी निसर्ग थक्क करणारे प्रकारही दर्शवत असतो. आता असाच एक प्रकार ब्राझिलमध्ये घडला आहे. (Twins) तिथे एका 19 वर्षीय तरुणीने जुळ्या मुलांना (Twins) जन्म दिला खरा, परंतु त्या दोन्ही बाळांचे वडील मात्र वेगवेगळे आहेत!

याची सुरुवात तिच्या मुलांच्या वाढदिवशी झाली. खरंतर या मुलांनी त्यांच्या वडिलांबद्दल आईला विचारणा केली, असे कळते. तेव्हा या मुलांच्या आईने खात्री करून घेण्यासाठी चाचणी केली. तिला ज्या पुरुषाबद्दल वाटत होते की तो या मुलांचा बाप असू शकतो त्याची डीएनए चाचणी करण्यात आली आणि त्या चाचणीअंतर्गत लक्षात की एकाच मुलाचा डीएनए त्याच्याशी जुळला, परंतु दुसर्‍याचा जुळला नाही. त्यामुळे तिला मोठा आश्चर्याचा धक्का बसला.

तेव्हा जेव्हा तिनं दुसर्‍या व्यक्तीची चाचणी केली तेव्हा त्याचे डीएनए दुसर्‍या व्यक्तीशी ‘मॅच’ झाले. समोर आलेल्या माहितीनुसार, या तरुणीने एका दिवशीच दोन पुरुषांसमवेत लैंगिक संबंध ठेवले होते. त्यामुळे ती दोघांपासूनही गर्भवती झाली होती. दोन वेगवेगळी स्त्री बीजे निर्माण झाली असतील व ती दोन वेगवेगळ्या पुरुषांच्या शुक्राणूंपासून एकाच वेळी फलित झाली तर अशी घटना घडू शकते. यासाठी शास्त्रज्ञांनी ‘हेटेरो पॅरेंटल सुपरफेकंडेशन’ ही संज्ञा वापरली आहे.

-हेही वाचा 

Sit : अनेक तास एकाच जागी बसून राहणे घातक

Star : तार्‍याला गिळत असलेले कृष्णविवर

Smart watch : ‘स्मार्टवॉच’ने वाचवला जीव!

Back to top button