Tyres काळ्या रंगाचेच का असतात? | पुढारी

Tyres काळ्या रंगाचेच का असतात?

नवी दिल्ली : शोरूममध्ये जेव्हा आपण कोणतीही गाडी घेण्यासाठी जातो, तेव्हा आपण वेगवेगळ्या रंगांच्या गाड्या तेथे असल्याचे पाहतो. त्यातून सगळ्यात चांगला रंग ज्या गाडीचा असेल ती गाडी आपण घेतो. मात्र, गाडीच्या टायरचा ( Tires ) रंग हा काळाच का असतो हा विचार तुम्ही कधी केला आहे का? चला तर याबाबत जाणून घेऊया…

काळ्या टायर्सविषयी अनेक सिद्धांत आहेत. सर्व कंपन्या या काळ्या टायर्सला का उत्तम मानतात याविषयी एक अहवालही होता. या अहवालात असे म्हटले आहे की, कच्चा रबराचा रंग हा पिवळ्या रंगाच्या छटेचा असतो, परंतु जेव्हा या रबरापासून टायर बनवले जातात तेव्हा ते लवकर झिजतात आणि मग आपल्याला सतत टायर बदलावे लागू शकतात. असे होऊ नये म्हणून टायर बनवणार्‍या रबरमध्ये कार्बन मिसळला जातो, यामुळे हा टायर जास्त काळ टिकतो.

कार्बनमुळे Tyres रंग काळा होतो

टायरला मजबूत करण्यासाठी त्यात घातलेल्या कार्बनमुळे त्याचा रंग काळा होतो. इतकंच काय तर हा टायर जास्त काळ टिकून राहतो. कार्बन व्यतिरिक्त टायर बनवताना त्यात सल्फर देखील मिसळवण्यात येते, त्यामुळे टायर अजून मजबूत होतो. तुम्हाला हे कळल्यावर नक्कीच आश्चर्य होईल की एकेकाळी गाड्यांचे टायर हे पांढर्‍या रंगाचे होते.

पांढर्‍या किंवा मग ‘ऑफ व्हाईट’ रंगाचे टायर हे काळ्या रंगाच्या टायरपेक्षा कमी मजबूत असतात. याच्या उलट तुम्ही पाहिले असेल की लहान मुलांच्या सायकलचे टायर हे रंगीबेरंगी असतात. त्यांच्या सायकलचे टायर हे काही महिन्यांतच खराब होऊ लागतात कारण त्यात कार्बनचा वापर करण्यात येत नाही. रिपोर्टस्नुसार साध्या रबरचा टायर हा 8 हजार किलोमीटर जाऊ शकतो, तर कार्बन असलेला टायर हा 1 लाख किलोमीटर लांब अंतर पार करू शकतो.

हेही वाचा : 

Back to top button