Healthy diet for bones : हिवाळ्यात हाडांसाठी ‘हा’ आहार उपयुक्त | पुढारी

Healthy diet for bones : हिवाळ्यात हाडांसाठी ‘हा’ आहार उपयुक्त

नवी दिल्ली : वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत शरीरातील हाडांची वाढ होत राहते, परंतु त्यानंतर हाडांच्या लांबीमध्ये वाढ नगण्य असते. 30 वर्षांनंतर ती पूर्णपणे थांबते. यानंतरही या हाडांना पोषक तत्त्वांची गरज असते. वयाच्या तिशीनंतर हाडांची ताकद आपल्या आहारावरच अवलंबून असते. जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि कॅल्शियमयुक्त अन्नाचा समावेश केल्यास हाडे मजबूत होतात. मात्र, आहारात या गोष्टींची कमतरता असल्यास हाडे कमकुवत होतात व अनेक आजारही होण्याची शक्यता असते. (Healthy diet for bones) हाडांसाठी विशेषतः हिवाळ्यात ‘हा’ आहार उपयुक्त ठरतो.

हाडांच्या मजबुतीसाठी हिरव्या भाज्यांचे सेवन सर्वात महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन के हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळते, ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो. जर शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर व्हिटॅमिन डीचे संतुलन बिघडते आणि व्हिटॅमिन डीचे संतुलन बिघडले तर कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही. रताळ्यामधील या गोष्टी हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. व्हिटॅमिन सी हाडांमध्ये किडणे प्रतिबंधित करते. (Healthy diet for bones) लिंबू, संत्री ही लिंबूवर्गीय फळे आहेत.

यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी देखील रोगप्रतिकार शक्ती वाढवते. (Healthy diet for bones)पाच लहान अंजीरांमध्ये 90 मिलीग्रॅम कॅल्शियम असते. याशिवाय पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील असते. म्हणूनच हाडे मजबूत करण्यासाठी अंजीराचे सेवन खूप फायदेशीर आहे. गाजर आणि पालकाचा रस, राजमा, काबुली चना, काळी डाळ, कुळीथ अशा धान्यांमध्ये कॅल्शियम असते. टूना माशासारख्या माशांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्व तसेच ‘ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड’ही असते जे हाडांसाठी लाभदायक ठरते.

हेही वाचा : 

Back to top button