प्याँगयाँग : उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याची ओळख संपूर्ण जगात 'सणकी' अशी आहे. हा गृहस्थ नेहमीच त्याच्या देशातील नागरिकांवर विचित्र नियम आणि बंधने लादताना पाहायला मिळतो. आता त्याला काय वाटले, कोणास ठाऊक, पण त्याने उत्तर कोरियामध्ये महिलांचे सौंदर्य वाढवणार्या रेड लिपस्टिकवरच बंदी घातली आहे. हे कमी म्हणून की काय महिलांनी सौंदर्य प्रसाधने वापरण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. यामागचे कारणही फार विचित्र आहे. खरे सांगायचे तर मेकअप हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. महिला सौंदर्यासाठी विशेष काळजी घेतात. लिपस्टिक (Red lipstick) हा महिलांच्या मेकअपचा फार महत्त्वाचा भाग आहे.
कोणताही कार्यक्रम असो वा उत्सव मेकअप केल्यावरच महिलांचा लूक पूर्ण होतो. लाल रंगाची लिपस्टिक महिलांची आवडती असते. उत्तर कोरियामध्ये लाल रंग भांडवलशाहीशी संबंधित असल्यामुळे या रंगाची लिपस्टिक (Red lipstick) महिलांनी वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
आता नव्या मीडिया रिपोर्टनुसार, लाल रंग हा भांडवलशाही), कम्युनिस्ट आणि व्यक्ती स्वातंत्र्यवाद याचे प्रतीक मानला जातो. व्यक्ती स्वातंत्र्यवाद म्हणजे स्वतःपेक्षा अन्य कोणीही मोठा नाही, अशी भावना होय. यामुळे उत्तर कोरियामध्ये लाल रंगांची लिपस्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे पालन व्यवस्थितरीत्या होण्यासाठी उत्तर कोरियात विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. ही खास पेट्रोलिंग टीम रोज महिलांच्या मेकअपची तपासणी करते. महिलांच्या पर्सदेखील तपासून त्यात रेड लिपस्टिक (Red lipstick) असेल, तर जप्त केली जाते. नियमांचे पालन न करणार्या महिलांवर कठोर कारवाई केली जाते आणि जबर दंडही आकारला जातो. शिवाय उत्तर कोरियातील महिला स्वदेशात बनवली जाणारीच सौंदर्यप्रसाधने वापरू शकतात. याशिवाय महिलांना हलक्या रंगाची लिपस्टिक लावण्याची परवानगी आहे.
येथे महिलांना केसांना रंग लावण्याचीही परवानगी नाही, कारण केसांना कलर करणे सरकारच्या विरोधात असल्याचे मानले जाते. स्त्रियांना त्यांचे मोकळे सोडण्याचीही परवानगी नाही. चेन, अंगठी, ब्रेसलेट असे दागिने घालण्यावरही उत्तर कोरियात बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा :