Water monitoring satellite : पृथ्वीवरील पाण्याचे परीक्षण करणारा उपग्रह | पुढारी

Water monitoring satellite : पृथ्वीवरील पाण्याचे परीक्षण करणारा उपग्रह

वॉशिंग्टन : ‘नासा’ने पृथ्वीवरील सरोवरे, नद्या व समुद्राच्या पाण्याचे परीक्षण (Water monitoring satellite) करण्यासाठी पहिला उपग्रह (सॅटेलाईट) लाँच केला आहे. कॅलिफोर्नियाच्या वँडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून ‘स्पेसएक्स फाल्कन 9’ रॉकेटच्या सहाय्याने ‘सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी’ हा उपग्रह लाँच करण्यात आला. ‘नासा’चे प्रशासक बिल नेल्सन यांनी सांगितले की, सध्या उष्ण समुद्र, प्रतिकूल हवामान, जंगलातील वणवे आदी अनेक आव्हानांचा सामना अवघे जगच करीत आहे.

नेल्सन यांनी सांगितले, हवामान संकटाचा सामना करण्यासाठी संपूर्ण जगाने एकजूट होणे गरजेचे आहे. एक द़ृष्टिकोन ठेवूनच या आव्हानाचा सामना करता येऊ शकेल. हा उपग्रह ‘नासा’ आणि फ्रेंच अंतराळ संशोधन संस्था ‘सेंटर नॅशनल डीट्यूडस् स्पॅटियालेस’ कडून बनवण्यात आला आहे. त्यामध्ये कॅनेडियन स्पेस एजन्सी आणि युके स्पेस एजन्सीचेही योगदान आहे. हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावरील 90 टक्क्यांहून अधिक जलाशयांच्या पाण्याचे (Water monitoring satellite) प्रमाण मोजेल. यावरून समुद्र हवामान बदलाला कसा प्रभावित करतो, हे समजून घेता येईल.

जागतिक तापमानवाढ कशा प्रकारे सरोवर, नद्या आणि जलाशयांना प्रभावित करते हे यावरून दिसून येईल. पुरासारख्या आपत्तींचा कसा सामना करावा हे यामुळे समजून घेता येऊ शकेल. (Water monitoring satellite) ‘एसडब्ल्यूओटी’ दर 21 दिवसांमध्ये किमान एकदा 78 अंश दक्षिण आणि 78 अंश उत्तर अक्षांशदरम्यान संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करील.

हेही वाचा :  

Back to top button