hippopotamus : पाणघोड्याच्या जबड्यातून सुखरूप बाहेर आले बालक! | पुढारी

hippopotamus : पाणघोड्याच्या जबड्यातून सुखरूप बाहेर आले बालक!

नैरोबी : काही काही प्राण्यांचे जबडे म्हणजे मूर्तिमंत ‘काळाचा जबडा’च असतात. वाघ-सिंहासारखे हिंस्र प्राणी असतील किंवा मगर, पाणघोडे यांच्यासारखे पाण्यात राहणारे प्राणी असतील, त्यांच्या जबड्यात गेलेला जीव सुखरूप बाहेर येणे दुरापास्तच असते. मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी,’ असाही अनुभव येत असतो. आफ्रिकेत नुकताच असा एक प्रसंग घडला. एका पाणघोड्याने (hippopotamus)  दोन वर्षांच्या बालकाला जिवंत गिळले, पण लगेचच बाहेर टाकूनही दिले. विशेष म्हणजे हे बालक सुखरूपपणे बाहेरही आले!

आफ्रिकन देश युगांडामधून हे धक्कादायक प्रकरण समोर ओल आहे. तिथे एका पाणघोड्यानं (hippopotamus) दोन वर्षांच्या मुलाला जिवंत गिळले. त्यानंतर पाणघोड्यानं मुलाला त्याच्या तोंडातून परत बाहेर काढले. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे पाणघोड्याच्या तोंडात जाऊनही मूल सुखरूप परतले. हे मुल तलावाच्या कडेला खेळत असताना ही घटना घडली. दोन वर्षांचा पॉल इगा युगांडातील एडवर्ड नदीच्या किनार्‍यावर खेळत होता. तिथे अचानक एक पाणघोडा पाण्यातून बाहेर आला आणि त्याने एडवर्डला पकडले. त्यानंतर त्याने मुलाला गिळण्याचा प्रयत्न केला.

इतक्यात तिथे असलेल्या एका व्यक्तीचे पाणघोड्याकडे (hippopotamus) लक्ष गेले आणि त्याने पालिले की त्या पाणघोड्याच्या तोंडात ते मूल आहे. लगेच ती व्यक्ती मुलाच्या मदतीसाठी पुढे गेली. त्या व्यक्तीने पाणघोड्यावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. हे पाहून पाणघोडाही त्रस्त झाला आणि पाण्यात जाण्यापूर्वी त्याने उलटी करून या दोन वर्षांचा मुलाला बाहेर फेकले. या पाणघोड्याच्या पकडीमुळे तो मुलगा जखमी झाला. त्यानंतर लगेचच उपचारासाठी त्या मुलाला रुग्णालयात नेण्यात आले. आता त्याची प्रकृती चांगली आहे.

हेही वाचा :  

Back to top button