Nagpur : विमानाला आग, इमर्जन्सी लँडिंग, विमानतळावर थरार, अन् पळापळ… | पुढारी

Nagpur : विमानाला आग, इमर्जन्सी लँडिंग, विमानतळावर थरार, अन् पळापळ...

पुढारी ऑनलाइन डेस्क : नागपूरच्या आकाशातून मार्गक्रमण करत असेल्या एका विमानाला आग लागल्याच्या वृत्ताने आज काही काळ तारांबळ उडाली. तातडीने हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात आला. या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र नंतर सुरू झाला प्रवाशांना बाहेर काढण्याचा थरार, काहीशी तारांबळ आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने विविध यंत्रणांनी घेतलेला सुटकेचा श्वास. हे चित्र होते आज नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील.

आकाशात विमानाला अपघात झाल्याचे वृत्त पसरल्याने विमानतळाच्या दिशेने अग्निशमन विभाग, पोलिसांची सुरक्षात्मक उपाययोजनांसाठी पळापळ सुरू झाली. ॲम्ब्युलन्सही सज्ज होत्या. मात्र, सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याने व लागलेल्या आगीवर फोमच्या साह्याने नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

विमानतळावर अशा प्रकारे अचानक आलेल्या आणीबाणीच्या प्रसंगी सुरक्षात्मक उपाययोजना व्यवस्थितरित्या कार्यरत आहेत की नाही हे पाहण्यासाठी मॉक ड्रील केले जाते. असेच मॉक ड्रील (सराव) काल नागपूर विमानतळावर करण्यात आले. नागपूरच्या विमानतळाची देखभाल असलेल्या मिहान इंडिया लिमिटेडच्या वतीने या सरावात एटीसी, एओसीसी, सिव्हील इंजिनिअरिंग सेक्शन, सीआयएसएफ जवान, शहर अग्निशमन सेवा, एमएडीसी अग्निशमन सेवा ,विविध रुग्णालय, एअर इंडिया, इंडिगो एअरलाइन्स, गो फर्स्ट, स्टार एअर,  शहर पोलीस आदी अनेकांनी सहभाग घेतला.

हे ही वाचा :

बिहारमधील दारू दुर्घटनेचे राज्यसभेतही तीव्र पडसाद

FIFA Golden Boot : मेस्सी ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत पिछाडीवर, जाणून घ्या समीकरण

Back to top button