Chest x-ray : छातीच्या एक्स-रेमधूनही समजेल हृदयविकाराचा धोका | पुढारी

Chest x-ray : छातीच्या एक्स-रेमधूनही समजेल हृदयविकाराचा धोका

वॉशिंग्टन : भविष्यात माणसाला हृदयविकाराचा धोका आहे की नाही हे समजण्यासाठी एक्स-रेचीही मदत होऊ शकेल असे एरव्ही आपल्याला वाटले नसते. मात्र, आता तसे शक्य झाले आहे. छातीचा (Chest x-ray) एक्स-रे काढल्यानंतर त्याच्या साहाय्याने व्यक्तीला पुढील दहा वर्षांत हृदयविकाराचा त्रास होईल किंवा नाही याबद्दलची शास्त्रीय माहिती आता आधीच समजू शकेल. कारण संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित एक प्रोग्राम विकसित केला आहे. उत्तर अमेरिकेतील रेडिओलॉजिकल सोसायटीने हा दावा केला आहे.

एआय (Chest x-ray) प्रोग्राम एक्सरेद्वारे धमन्यांतील कठिणतेची स्थिती लक्षात घेते. याद्वारे डॉक्टर संभाव्य धोका असलेल्या व्यक्तींना ओळखू शकतील. त्याचबरोबर फॅट व कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधी देऊन हा धोका टाळण्याचा प्रयत्न होऊ शकेल. हृदयविकारामुळे दरवर्षी जगभरात 1 कोटी 80 लाख लोकांवर प्राण गमावण्याची वेळ येते.

प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. जॅकब व्ही.एस म्हणाले, आमचे डीप लर्निंग मॉडेल हृदयासंबंधीच्या आजारांना वेळेआधीच ओळखेल. हे यंत्र डेटाचा पॅटर्न लक्षात घेऊन भविष्यातील घटनांचे पूर्वानुमान मांडेल. सध्या व्यक्तीचे वय, लिंग, वंश, रक्तदाब, धूम्रपानाची सवय, मधुमेह टाईप-2, रक्त तपासणीनंतर संभाव्य धोक्याचा वेध घेतला जातो. ही खूप किचकट पद्धती ठरते. आता (Chest x-ray) एक्स-रेमधूनच असा धोका ओळखला जाऊ शकेल व त्याचा लाभ घेऊन वेळीच उपाययोजना करता येऊ शकतील.

हेही वाचा : 

Back to top button