Snakebite : किंग कोब्रा चावला, म्हणून आठ वर्षाच्या मुलाने पुन्हा दोनदा क्रोब्राला चावले अन् साप मेला | पुढारी

Snakebite : किंग कोब्रा चावला, म्हणून आठ वर्षाच्या मुलाने पुन्हा दोनदा क्रोब्राला चावले अन् साप मेला

पुढारी ऑनलाइन डेस्क : Snakebite : आता पर्यंत आपण किंग कोब्रासारख्या विषारी सापाच्या दंशाने अनेकांचे प्राण गेल्याच्या बातम्या वाचल्या असतील. मात्र लहान मुलाच्या चाव्याने किंग कोब्रा मेला हे कदाचित पहिल्यांदाच वाचत असाल. मात्र हे घडले आहे. छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील दीपक नावाच्या मुलाने किंग कोब्राचा दोनदा चावा घेतला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Snakebite : याबाबत इंडिया टुडे ने वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यात आठ वर्षाचा दीपक आपल्या घराच्या अंगणात आनंदाने खेळत होता. मात्र, त्यावेळी अंगणात अचानक किंग कोब्रा हा साप आला. त्याला पाहून दीपक जीवाच्या आकांताने घाबरला. कोब्राने अचानक स्वतःला दीपकच्या हाताभोवती गुंडाळून घेतले. दीपक आणखीच घाबरला.

Snakebite : दीपकने स्वतःचा हात सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र कोब्राने अधिकच घट्ट गुंडाळून घेतले होते. त्यातच किंग कोब्राने फुत्कारत त्याला दंश केला. त्यामुळे दीपकला प्रचंड यातना होत होत्या. त्याला काहीही करून स्वतःला सोडवायचे होते. म्हणून त्याने सापाला चावा घेतला. मात्र, तरीही कोब्रा हातावरून हलला नाही. म्हणून दीपकने पुन्हा एकदा कोब्राला चावा घेतल्याने कोब्राचा मृत्यू झाला.

Snakebite : त्यानंतर त्याने आपल्या पालकांना साप चावल्याबद्दल सांगितले तेव्हा मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने दवाखान्यात नेले. दवाखान्यात त्याला सर्पविरोधी विष देण्यात आले आणि एक दिवस निरीक्षणाखाली ठेवले. त्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की सापानेत त्याला कोरडा चावा घेतला होता म्हणजेच त्याने कोणतेही विष सोडले नव्हते. त्यामुळे मूलगा तंदरुस्त आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Snakebite : दीपकने याविषयी बोलताना म्हटले, ” साप माझ्या हाताला गुंडाळला आणि मला चावा घेतला. मला खूप वेदना होत होत्या. मी त्याला झटकून टाकण्याचा प्रयत्न केला पण तो सरपटणारा प्राणी हलला नाही म्हणून मी त्याला दोनदा चावा घेतला. हे सर्व एका झटक्यात घडले.” असे न्यू इंडियन एक्सप्रेसने उद्धृत केले आहे.

हे ही वाचा :

कराडमध्ये कृष्णा नदीपात्रात पोहणार्‍यावर मगरीचा हल्ला

लेण्याद्री : शिवनेरीवर सहा वर्षांच्या मुलावर माकडाचा हल्ला

Back to top button