Holiday : आठवड्यातून एकदा सुट्टीचा दिवस असतोच; पण तुम्हाला माहीत आहे का सुट्टी कोणी सुरू केली? वाचा सविस्तर | पुढारी

Holiday : आठवड्यातून एकदा सुट्टीचा दिवस असतोच; पण तुम्हाला माहीत आहे का सुट्टी कोणी सुरू केली? वाचा सविस्तर

नवी दिल्ली ः आठवड्यातून एकदा सुट्टी व गरज असेल त्यावेळी रजा घेणे हा प्रत्येकाच्या अधिकाराचाच भाग आहे. शाळा असो किंवा कार्यालय, विश्रांतीसाठी आठवड्यातून एकदा सुट्टीचा दिवस (Holiday) असतोच. ही सुट्टी कुणी सुरू केली असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. वाचा सविस्तर कोणी सुट्टी सुरु केली ते.

रोमन लोकांनी सर्वप्रथम सुट्टीला सुरुवात 

लेखक, इतिहासकार आणि प्रवासी टोनी पेरोट यांच्या मते, रोमन लोकांनी सर्वप्रथम सुट्टीला सुरुवात केली होती. भारतात रविवारची सुट्टी सर्वप्रथम ब्रिटिशांनी सन 1843 मध्ये सुरू केली होती. वेगवेगळ्या धर्मांमधील मान्यतेनुसार शुक्रवार, शनिवार किंवा रविवार हा विश्रांतीचा दिवस मानला जातो. उन्हाळ्याची सुट्टी कधी सुरू झाली याबाबतही आपल्याला कुतुहल असू शकते. सुमारे 200 वर्षांपूर्वी शाळा वर्षभर सुरू असायच्या. शहरी शाळांना दर तीन महिन्यांनी सुट्टी असायची.

Holiday : उन्हाळी सुट्टी

खेड्यातील शाळांना वसंत ऋतू आणि शरद ऋतूत सुट्ट्या मिळत असत, जेणेकरून शेतकर्‍यांची मुलं रोपलावणी व पिकांच्या काढणीस पालकांना मदत करू शकतील. त्या काळात बहुतांश लोक शेतीवरच अवलंबून असत. सन 1800 च्या दशकात अमेरिकेतील शहरी शाळांमध्ये उन्हाळ्यातील सुट्ट्या नव्हत्या. त्यामुळे होरेस मान या शिक्षण सुधारकाला याबाबत चिंता वाटू लागली. मुलांचे कोवळे मन तणाव झेलू शकणार नाही असे त्यांना वाटले. त्यामुळे सन 1840 मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात झाली. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक दोघेही खूश झाले!

हेही वाचलंत का?

Back to top button