जगातील सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बीण ‘जेम्स वेब टेलिस्कोप’मध्ये तांत्रिक बिघाड | पुढारी

जगातील सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बीण ‘जेम्स वेब टेलिस्कोप’मध्ये तांत्रिक बिघाड

वॉशिंग्टन : जगातील सर्वात शक्तिशाली अंतराळ दुर्बीण ‘जेम्स वेब’च्या एका पार्टमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. या उपकरणाचे नाव ‘मिड-इन्फ्रारेड इन्स्ट्रूमेंट’ (एमआयआरआय) असे आहे. पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्पेस टेलिस्कोपला गेल्या वर्षी 25 डिसेंबरला लाँच करण्यात आले होते.

या दुर्बिणीने आतापर्यंत ब्रह्मांडाची अनेक थक्क करणारी छायाचित्रे टिपली आहेत. ‘हबल’ या अंतराळ दुर्बिणीला पर्याय म्हणून ही दुर्बीण पाठवण्यात आलेली आहे. आता या दुर्बिणीतील तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने एक समीक्षा बोर्ड बनवला आहे. ज्या भागात हा बिघाड आहे ते ‘एमआयआरआय’ नावाचे उपकरण म्हणजे एक कॅमेरा व स्पेक्ट्रोग्राफ आहे. त्याच्या मदतीने जेम्स वेब टेलिस्कोप 5 ते 27 मायक्रोमीटरच्या वेव्हलेंथ रेंज पाहण्यासाठी सक्षम असतात.

‘एमआयआरआय’चे चार ऑब्झर्व्हिंग मोड आहेत. त्यामध्ये इमेजिंग, लो रिझोल्युशन स्पेक्ट्रोस्कोपी, मीडियम रिझोल्युशन आणि कोरोनाग्राफिक इमेजिंगचा समावेश होतो. ‘एमआयआरआय’च्या मीडियम रिझोल्युशन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये टेक्निकल ग्लिच निर्माण झाला आहे. 24 ऑगस्टला एका पाहणीवेळी त्याला साहाय्यक यंत्रणेत गरजेपेक्षा अधिक फ्रिक्शन म्हणजेच घर्षण आढळून आले.

अधिक वाचा :

Back to top button