पुढारी ऑनलाइन डेस्क : अवकाश निरीक्षण करणा-या आणि हौशी खगोलप्रेमींना उद्या बुधवारी (दि.13) पुन्हा एकदा सुपरमून पाहण्याची संधी मिळणार आहे. अवघ्या एक महिन्याच्या अंतरानंतरच पुन्हा एकदा सुपरमून पाहायला मिळणार असल्यामुळे खगोलप्रेमींमध्ये उत्साह आणि उत्सुकता आहे.
गेल्या महिन्यात 14 जूनला सूपरमून पाहण्याची संधी होती. मात्र अनेकांनी ही संधी गमावली होती. आता फक्त 1 महिन्यानंतरच ही संधी पुन्हा चालून आल्याने अवकाश निरीक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अवकाश निरीक्षण किंवा भविष्यात खगोलशास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न पाहणा-या विद्यार्थ्यांसाठी देखील ही उत्तम संधी आहे.
चंद्र जेव्हा पृथ्वीच्या खूप जवळ येतो तेव्हा तो नेहमीपेक्षा मोठा दिसतो. त्याला सुपरमून असे म्हणतात. तसेच या तीन चार दिवसादरम्यान चंद्र पौर्णिमेप्रमाणे पूर्ण दिसतो. तर प्रत्यक्षात पौर्णिमेला नेहमी पेक्षा जास्त मोठा दिसतो. त्यामुळे मंगळवारी पहाटे पासून शुक्रवारपर्यंत पूर्ण चंद्र पाहता येणार आहे. तर उद्या बुधवारी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ म्हणजेच 3,57,264 किमी अंतरावर येणार आहे. त्यामुळे सुपरमून पाहता येणार आहे. खगोलप्रेमींनी ही संधी दवडू नये!
हेही वाचा: