जेलीसारखा दिसणारा विचित्र मासा | पुढारी

जेलीसारखा दिसणारा विचित्र मासा

न्यूयॉर्क : समुद्रांच्या अथांग दुनियेत अनेक रहस्ये दडलेली आहेत. अनेक अज्ञात व विचित्र जीव वेळोवेळी समुद्र दर्शवत असतो. आता अशाच अनोख्या दिसणार्‍या माशाचा शोध लागला आहे. हा मासा एखाद्या जेलीसारखा व पारदर्शक आहे. त्याच्या शरीरावर अनोखे सक्शन कपही आहेत.

अलास्काजवळ खोल समुद्रात संशोधन करणार्‍या वैज्ञानिकांच्या हाती हा अनोखा मासा लागला. हा ब्लॉच्ड स्नेलफिश असून त्याचे वैज्ञानिक नाव ‘क्रायस्टॅलिचथीस सायक्लोस्पिलस’ असे आहे. हा मासा समुद्रतळाशीच वावरत असतो. विशेषतः उत्तर पॅसिफिक महासागराच्या तळाशी या माशाचे अस्तित्व असते. तो समुद्राच्या पृष्ठभागापासून 2723 फूट खोलीवरही राहू शकतो हे विशेष.

नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फिरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नोआ)च्या संशोधकांनी अलास्काच्या एलुशियन आयलंडस्जवळ हा मासा शोधला. या शोधमोहिमेतील एक सदस्या सारा फ्रीडमन यांनी त्याचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हातात जेली पकडल्यासारखाच त्याचा स्पर्श होता असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button