सैयामी पुन्हा अभिषेकबरोबर | पुढारी

सैयामी पुन्हा अभिषेकबरोबर

ही सैयामी खेर कोण आठवते का? जुन्या जमान्यातील मराठी व हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री उषा किरण यांची नात व अभिनेत्री तन्वी आझमी यांची भाची अशी तिची कौटुंबिक ओळख. सैयामीने अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन याच्यासमवेत ‘मिर्झिया’ या चित्रपटातून पदार्पण केले होते, मात्र हा चित्रपट चालला नाही. त्यानंतर ती अभिषेक बच्चनसमवेत ‘ब—ीद’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. आता पुन्हा एकदा ती अभिषेकसमवेत दिसणार आहे. ‘घूमर’ असे या नव्या चित्रपटाचे नाव आहे. ‘दसवी’ला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर आता अभिषेक आपले करिअर पुन्हा एकदा नव्याने सावरतो आहे. सैयामीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचे फर्स्ट लूक शेअर केले आहे. यामध्ये ती एका क्रिकेटपटूच्या भूमिकेत असून अभिषेक तिच्या कोचच्या भूमिकेत आहे.

Back to top button