डेनिसोवन मुलीच्या दाताचा शोध | पुढारी

डेनिसोवन मुलीच्या दाताचा शोध

लंडन ः ‘होमो सेपियन्स’ या मानवाच्या पूर्वजांपासून आधुनिक माणूस विकसित झाला असे मानले जाते. मात्र, केवळ हीच एकमेव मानव प्रजाती होती असे नाही. निएंडरथल, डेनिसोवन आणि फ्लोरेसिएन्सिस (हॉबिट) अशा अन्यही काही वेगळ्या मानव प्रजाती अस्तित्वात आल्या होत्या ज्या कालौघात नामशेष झाल्या. आता संशोधकांना एक दात सापडला असून हा दात डेनिसोवन प्रजातीच्या मुलीचा असावा असे त्यांना वाटत आहे.

सध्या जिथे लाओस आहे तिथे तब्बल 1 लाख 64 हजार वर्षांपूर्वी एका गुहेत ही मुलगी राहत होती. यापूर्वी डेनिसोवन या रहस्यमय मानव प्रजातीचे अवशेष केवळ सैबेरिया आणि चीनमध्येच सापडले होते. मात्र, आता हा दात डेनिसोवन मुलीचाच असल्याची पुष्टी झाली तर हे लोक लाओसच्या भागातही होते असे सिद्ध होईल.

फ्रान्समधील पॅलिओ अँथ—ोपोलॉजिस्ट क्लेमेंट झॅनोली यांनी सांगितले की डेनिसोवन लोक पर्यावरणाच्या मोठ्या रेंजमध्ये राहत होते असे यावरून दिसून येते. रशिया, चीनमधील अतिथंड पर्वतांपासून ते आग्‍नेय आशियातील जंगलांपर्यंत अनेक ठिकाणी त्यांचे अस्तित्व होते. त्यांच्या जनुकीय अभ्यासावरून असे दिसून आले होते की ते शक्यतो उंच ठिकाणी आणि थंड वातावरणात राहत होते. मात्र, ते उष्ण, दमट वातावरणात तसेच मैदानी भागांमध्येही होते, असे दिसून आले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button