Porn racket case : पॉर्न रॅकेटप्रकरणी राज कुंद्रावर ‘ईडी’ने दाखल केला गुन्‍हा | पुढारी

Porn racket case : पॉर्न रॅकेटप्रकरणी राज कुंद्रावर 'ईडी'ने दाखल केला गुन्‍हा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

पॉर्न व्‍हिडीओ रॅकेटप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर ‘ईडी’ने गुन्‍हा दाखल केला आहे. ( Porn racket case )  या प्रकरणी २० जुलै २०२१ रोजी मुंबई पोलिसांनी त्‍याला अटक केली होती. यानंतर त्‍याची जामीनावर सुटका झाली. आता पुन्‍हा एकदा याप्रकरणी ईडीने गुन्‍हा दाखल केल्‍याने त्‍यांच्‍यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Porn racket case : चित्रपटात काम देण्‍याच्‍या आमिषाने पॉर्न व्‍हिडीओचे चित्रीकरण

मुंबई पोलिसांनी पॉर्न व्‍हिडीओ रॅकेटप्रकरणी सर्वप्रथम फेब्रुवारी २०२१ मध्‍ये पाच जणांना अटक केली होती. सर्व आरोप हे अभिनेत्रींना वेब सीरिज व बॉलीवूडमधील चित्रपटांमध्‍ये काम देण्‍याचे आमिषाने पॉर्न व्‍हिडीओचे चित्रीकरण करत असत. चित्रपटात काम मिळण्‍याच्‍या आशेने मॉडल व अभिनेते अश्‍लील व्‍हीडीओमध्‍ये काम करण्‍यास तयार होत असत. अभिनेत्रींना न्‍यूड सीन करण्‍यास सांगितले जात असत. त्‍यांनी नकार दिल्‍यास धमकी दिले जात असे तसेच शुटिंगचा खर्च द्‍यावा लागेल, असेही सांगितले जात असे, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली होती. हे व्‍हिडीओ इंटरनेटवर डाउनलोड करुन केवळ सब्‍बसक्राइबर्संनाच पैसे घेवून पुरवले जात असत. या ॲपची मालक हा राज कुंद्राचा नातेवाईक होता.

याप्रकरणी पोलिसांनी राज कुंदॅाचा आयटी हेड रेयान थोर्प याला अटक केली. यानंतर राज कुंद्राचा सहभाग असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. २० जुलै २०२१ रोजी मुंबई पोलिसांनी राज कुंद्रा याला अटक करण्‍यात आली होती. यानंतर सप्‍टेंबरमध्‍ये त्‍याला जामीन मंजूर झाला होता. आता याप्रकरणी ईडीने गुन्‍हा दाखल केल्‍याने त्‍याला पुन्‍हा अटक केले जाईल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button