कॅटरिनाच्या बॉलिंगने चाहते झाले ‘बोल्ड’

कॅटरिनाच्या बॉलिंगने चाहते झाले ‘बोल्ड’
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. विकी कौशलसोबत विवाह झाल्यानंतर चाहते कॅटरिनाच्या पोस्टची जरा जास्तच प्रतीक्षा करू लागले आहेत. चाहत्यांना निराश न करता कॅटरिनाही नियमितपणे सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना काही ना काही तरी अपडेट्स देत असते. याचाच एक भाग म्हणून कॅटरिनाने आपली लेटेस्ट छायाचित्रे शेअर केली आहेत.

यामधील दोन छायाचित्रे चाहत्यांना फारच आवडलेली दिसत आहेत. कॅटरिना या दोन छायाचित्रांत चक्‍क गोलंदाजी करत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी ती अत्यंत आनंदी असल्याचे दिसून येत आहे. ही छायाचित्रे शेअर करताना कॅटरिनाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'ए व्हेरी अमेरिकन सॅटरडे.' हे फोटो शेअर करताच काही वेळातच लाखो चाहत्यांनी ते लाईक केले. यावर बॉलीवूडमधील अन्य कलाकारही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये ती युनिक स्टाईलमध्ये दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news