सर्वाधिक वयाचा कुत्रा! | पुढारी

सर्वाधिक वयाचा कुत्रा!

वॉशिंग्टन ः अमेरिकेतील गिसेला शोर या महिलेने 21 वर्षांपूर्वी कुत्र्याचे एक छोटेसे पिल्‍लू घरी आणले होते. त्यावेळी ते अन्य सर्वसाधारण पिल्‍लांप्रमाणेच होते. मात्र, आता याच पिल्‍लाने दीर्घायुष्यी होण्याचा विक्रम केला आहे. 21 वर्षांचे हे कुत्रे जगातील सर्वात वृद्ध श्‍वान ठरले आहे. याबाबत त्याची नोंद गिनिज बुकमध्येही झाली आहे.

गिनिज रेकॉर्डने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबतची पुष्टी केली आहे. सर्वसाधारणपणे एखादा कुत्रा दहा ते तेरा वर्षे जिवंत राहतो. मात्र, टोबीकीथ नावाचा हा कुत्रा आता 21 वर्षे 66 दिवस वयाचा झाला आहे. अजूनही तो ठणठणीत आणि सक्रिय आहे हे विशेष. इन्स्टावर टोबीच्या या व्हिडीओला आतापर्यंत 16 हजारांपेक्षाही अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि ही संख्या वाढतच आहे.

टोबीची मालकीण गिसेला यांनी सांगितले की मी माझ्या श्‍वानाला भात, भाज्या आणि प्रोटिनयुक्‍त आहार देते. सकस आहार आणि भरपूर झोप हे त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. या वयातही त्याचे आरोग्य उत्तम आहे. त्याला अन्य कुत्र्यांशी खेळणे आणि बाहेर फेरफटका मारण्यासाठी जाणे आवडते. हा चिहुआहुआ प्रजातीचा कुत्रा आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचलंत का? 

Back to top button